“जेव्हा देशाचा पंतप्रधान मी निची जातीतून येतो असे बोलतो हा एक धक्काच आहे. कारण ज्यावेळी मी आवाज उठवला होता ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रिपद मिळावे तेव्हा मोदी होते जे म्हणाले होते की ओबीसी ला याची गरज नाही.” असे पटोले म्हणाले.
भारतीय जनता पार्टी मधुन राजीनामा दिल्यानंतर गोंदिया-भंडारा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 42 टक्के वाढ झाली आहे. मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्यासोबत वाद घातला होता. मोदी हे खरच मागास जातीचे आहे काय याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे. त्यांच्या पापाचे भांडे फोडणार, असे वक्तव्य खासदारकीचा राजीनामा देणारे खासदार नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रणालीला विरोध करत शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आता गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरून ते मोदींविरोधात प्रचार करणार आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे म्हटले आहे.
पटोले म्हणाले, की मी ११ तारखेला राहुल गांधींसोबत सभेत गुजरातमध्ये सहभागी होणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. माझ्या जागेवर निवडणूक होईल की नाही हे माहित नाही. दानवे हे फार महान आहेत मी शेतकऱ्यांच्या प्रती बहुजनांसाठी राजीनामा दिला. दानवे आपली खुर्ची वाचवण्यासाठी बोलले असतील. केंद्र सरकारमध्ये जे चाललंय ते संविधानिक व्सवस्थेसाठी चांगले नाही. नोटबंदी हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. राहुल गांधी यांचे व्हिजन चांगले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर ही राजीनामा देण्याची वेळ आली नसती.
नाना पटोले यांचा राजीनामा :
Loksabha se isteefa pic.twitter.com/a66dqjMCzN
— Kumar Vikrant Singh (@KumarVikrantS) December 8, 2017