आजकालच्या काळात अनेक मुली गुणवत्ता असतानी सुध्दा चालत आलेल्या रूढी परंपरा नुसार शिक्षणापासून वंचित राहतात किंवा संकुचित दृष्टीकोनामुळे घरी राहतात ह्या सर्वाना प्रेरणा म्हणजे मोक्षदा पाटील…
मोक्षदा अनिल पाटील
कावपिंपरी ता. अमळनेर जिल्हा. जळगाव
येथील मुल रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटलांची स्तुती संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. कारण हि तसेच आपल्या प्रशासनाने गुंडाच्या मुसक्या आवळण्यात मोक्षदा पाटील ह्यांनी वाशीम जिल्ह्यात स्वतःची चांगलाच धाक निर्माण केला आहे.
अनिल ओंकार पाटील ठाणे महानगर पालिकेत अभियंता त्यांना दोन मुली दोघींनीही त्यांचा मार्ग निवडला आणि त्या आयुष्यात त्यांचा मार्गावर यशस्वी सुध्दा झाल्या. त्यांच्या वडिलानी त्यांना कुठल्याही गोष्टीचा दबाव न देता त्यांचा मार्ग त्यांना निवडायला लावला.
मुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्या साठी भरीव कामगिरी मोक्षदा पाटील ह्यांनी केली.
सद्या वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या पदावर मोक्षदा पाटील आहेत. वाशीम शहरातील रोड रोमिओना चांगलाच धडा मोक्षदा पाटील यांनी निर्भया पथकांद्वारे जरब बसवली. वाशीम जिल्ह्यात मागील ४ महिन्यात ४०० पेक्षा जास्त कार्यवाही करणाऱ्या मोक्षदा पाटील ह्या पहिल्या अधिकारी आहे. मोक्षदा पाटील ह्यांनी येथील माफिया व गुंडांना चांगलाच धडा शिकवला आहे. गुटखा,दारू,सट्टेबाजी ह्या वाशीम मधून हद्दपार झाल्या आहेत. याची स्तुती सहकारी अधिकारी व कर्मचारी सुध्दा करत आहे.
एक कठोर पोलीस अधिकारी व सोबत एक प्रेमळ आई ह्या भूमिका मोक्षदा पाटील उत्तम रित्या पार पाडत आहे. २०१३ साली आस्तिककुमार पांडे यांच्या सोबत मोक्षदा पाटील यांचा विवाह झाला. आस्तिककुमार सध्या अकोल्याचे जिल्हाधिकारी आहे. त्यांच्या मुलाचे नाव आयमान…
मोक्षदा पाटील यांच्या मते आपले पहिले गोल ठरवून घ्या व शारीरिक क्षमता जाणून नंतर आपल्या परिश्रमाने कोणतेही ध्येय आपण गाठू शकता. महिला सक्षमीकरण विषयी सगळे बोलतात परंतु त्यांच्या मते पहिले घरातून ह्या गोष्टीची सुरवात घरापासून सुरवात करावी. त्यांच्या मते अस्तित्व दाखविण्यासठी स्त्रियांनी कर्तुत्व सिद्ध करावे…
महाराष्ट्रात सध्या लेडी सिंघम म्हणून मोक्षदा पाटील ह्यांना ओळखण्यात येते त्यांना अस्सल पुणेरी चा मुजरा
Mala bhetayche mokshda patila………..
Please mala bhetayche IPS mokshda patila