सर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन

0
सर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन

१५ डिसेंबर 15 December World Tea Day

आज जागतिक चहा दिन World Tea Day…

त्यानिमित्ताने थोडंसं गंमतीशीर पण रोचक…

Best tea in pune चहा

पिशवी गरम पाण्यात बुचकळून केलेला चहा,
इराण्याच्या हॉटेलातील विचित्र चवीचा चहा,
शेट्टीच्या हॉटेलातील मोठ्या कपातला न संपणारा चहा,
अमृततुल्य मधील कधीच संपू नये असे वाटणारा इलायची चहा,
लग्न कार्यात कप मोजून दिला जाणारा व्यावहारिक पण चविष्ट चहा,

पावसाळ्यातला गरम गरम गवतीचहायुक्त चहा,
सासुरवाडीचा नक्षीदार कपातून आलेला मसाला चहा,
फाईव्ह स्टार मधला गरम थर्मासमधून खोलीत आलेला कंटाळवाणा चहा,
आजारपणात बायकोनं औषधांसाठी दिलेला फिकट चहा,
गावाकडच्या मित्राकडे घेतलेला गुळाचा बराच गोड चहा,
आपणच आपल्यासाठी केलेला प्रमाण चुकलेला कडवट चहा!

आणि सर्वात सुंदर चहा म्हणजे आपल्या मुलीने पहिल्यांदाच बाबांसाठी केलेला दुप्पट साखरेचा स्ट्रॉंग चहा!

भारतात चहा हा नुसता चहा नाही, ती एक भावना आहे, ती चहाच्या चवीमध्ये बेमालूमपणे मिक्स होऊन येणारी ती आपुलकी आहे!

सगळ्या चहाटळ लोकांना प्रणाम !

©PuneriSpeaks

अशाच अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि  टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

The Famous Tea Seller Yewle Tea House from Pune City Earns 12 lakh per Month

महाराष्ट्र आणि मिसळ….!

Real Story of Mowgli, खऱ्या आयुष्यातील मोगली

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.