सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ५ व्या स्थानी, मोदी यांना ६५ % हुन अधिक पसंती

0
सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ५ व्या स्थानी, मोदी यांना ६५ % हुन अधिक पसंती

सी व्होटर ने सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेता यासाठी सर्वेक्षण केले आहे. राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्क्यांहून अधिक मते देऊन आपली पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत पाचव्या स्थानावर आहेत.

नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. सी व्होटर ने “स्टेट ऑफ द नेशन २०२०: मे” नावाने सर्वात मोठे सर्वेक्षण केले आहे, ज्यात प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी ३००० लोकांचा प्रतिसाद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यनिहाय मिळालेली पसंती

राज्ये % टक्क्यांमध्ये
ओडिसा ९५.६
हिमाचल प्रदेश ९३.९५
छत्तीसगढ ९२.७३
आंध्रप्रदेश ८३.६
झारखंड ८२.९७
कर्नाटक ८२.५६
गुजरात ७२.६२
आसाम ७४.५९
तेलंगणा ७१.५१
महाराष्ट्र ७१.४८
सर्वात समाधानी राज्यांच्या मतांमध्ये कमी पसंती तामिळनाडू मधून असून तामिळनाडू मधून केवळ ३२.१५ टक्के पंतप्रधानांना पाठिंबा आहे. त्यानंतर केरळमध्ये ३२.८९ टक्के इतकी पसंती आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये ५०.२३ आणि ५१.२५ टक्के तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये अनुक्रमे ५२.५४ आणि ५३.५३ टक्क्यांची पसंती आहे. बहुतांश सर्वेक्षण केलेल्या ६६.२% लोकांनी पंतप्रधानांच्या बाजूने मतदान केले, तर राहुल गांधी हे २३.२१% लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री | Top 10 Popular CM in India

मुख्यमंत्रीराज्यटक्के
नवीन पटनाईक ओडिसा ८२.९६
भूपेश बाघेल छत्तीसगड ८१.०६
पिनाराय विजयनकेरळ८०.२८
जगन मोहन रेड्डी आंध्रप्रदेश ७८.०१
उद्धव ठाकरे महाराष्ट्र ७६.५२
अरविंद केजरीवाल दिल्ली ७४.१८
जयराम ठाकूर हिमाचल प्रदेश ७३.९६
बी एस येडियुरप्पा कर्नाटक ६७.२१
के चंद्रशेखर रावतेलंगणा ५४.२२
ममता बॅनर्जीपश्चिम बंगाल ५२.०६

सर्वात कमी लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री मध्ये हरियाणा चे मनोहर लाल खट्टर यांना ४.४७ टक्के आहेत, तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत हे १७.७२ टक्के आहेत. पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग २७.५१ टक्के आणि बिहारचे नितीश कुमार ३०.८४ टक्के आहेत. तामिळनाडूच्या ई पलानिस्वामी यांना ४१.२८ टक्क्यांचा पाठिंबा आहे, तर गोव्याचे प्रमोद सावत ४२.७९ टक्के आहेत.

सर्वात समाधानी राज्य

सर्वात समाधानी राज्य मध्ये हिमाचल प्रदेश आणि त्यानंतर ओडिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, झारखंड, गुजरात, आसाम, उत्तर पूर्व, तेलंगणा आणि कर्नाटक अशी अनुक्रमे राज्ये येतात. तर गोवा, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल हि सर्वात कमी समाधानी राज्ये आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.