सत्तेत राहणे शिवसेनेच्यादृष्टीने नुकसानीचे : खा. आढळराव पाटील

0
सत्तेत राहणे शिवसेनेच्यादृष्टीने नुकसानीचे : खा. आढळराव पाटील

पिंपरी : केंद्र व राज्यातील भाजप सरकारमध्ये राहणे शिवसेनेच्यादृष्टीने नुकसानीचे आहे, असे शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आज येथे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला. मात्र, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दोन्ही सरकारमध्ये शिवसेना आहे, असे वाटतच नाही,असेही ते म्हणाले. भाजपमध्ये जाणार नसल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले. माझा स्वतःचाच भाजपमध्ये जाण्यास विरोध आहे, असे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कामांचा आढावा घेण्यासाठी ते पिंपरीत आले होते. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी त्यांनी आपल्या मतदारसंघात मोडत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील भोसरीतील प्रश्‍नासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकफाटा ते भोसरी या पुणे-नाशिक महामार्गाच्या टापूचे सहापदरीकरण कामावरून तसेच बैलगाडा शर्यतीवरून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केले. अनधिकृत बांधकाम नियमतीकरणावरून लांडगे व भाजपचे दुसरे आमदार व पिंपरी-चिंचवड अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली. बैलगाडा शर्यत सुरू होण्यापूर्वीच त्याचे श्रेय घेणारे फलक यांनी लावले असे सांगत त्यांनी लांडगेंचा समाचार घेतला.तर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या कायद्याचा लाभ फक्त दहा टक्के अनधिकृत घरांनाच होणार असल्याने त्यावरूनही श्रेय घेणाऱ्या जगताप यांनाही त्यांनी लक्ष्य केले.तसेच हा कायदा स्पष्ट नसल्याने पुढील दोन वर्षे म्हणजे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत अनधिकृत बांधकामे ही नियमित होण्याची शक्‍यता नाही, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…..?

पिंपरी-चिंचवड चा गोल्डन मॅन ?️?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.