Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी !

1
Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी !

“मुळशी पॅटर्न” Mulshi Pattern मराठी चित्रपट सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. सर्व सिनेमागृहात चित्रपट हॉउसफ़ुल्ल झाला आहे.  चित्रपट प्रदर्शनावरून अनेक वाद सुद्धा झाले आहेत. अनेक जण या चित्रपटाच्या पात्राबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चित्रपटात दाखवलेली स्टोरी खरी आहे कि खोटी हा प्रश्न सर्वांना पडत आहे. खरेतर मुळशी पॅटर्न Mulshi Pattern हा चित्रपट मुळशी भागातील एका डॉन च्या जीवनाशी मिळता जुळता आहे. हा नक्की डॉन कोण होता? हे आपण आज पाहुयात.

Mulshi Pattern Real Story

Mulshi Pattern Poster
Mulshi Pattern Poster

एक गाव मुठा नावाने प्रसिद्ध असलेले मुळशी तालुक्यातील एक गाव, या गावाला सामाजिक ऐतिहासिक राजकीय वारसा लाभलेला आहे. अडीच-तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावातील एका १९-२० वर्षाच्या पहिलवान पोराने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकत आपला दबदबा निराम करत पुण्यात मोठे नाव केले होते. संदीप मोहोळ (Sandeep Mohol) असे या तरुणाचे नाव…. बोडके टोळीच्या साथीने संदीप मोहोळ यांची प्रसिद्धी युवकांच्यात प्रचंड वाढत गेली होती. श्रीमंतांना त्रास देउ शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणे अशा कामामुळे पुण्यात संदीप मोहोळ (Sandeep Mohol)  उदयास आला होता. संदीप मोहोळ (Sandeep Mohol) याने सुरुवातीस बोडके टोळी सोबत काम करत नाव कमावले. नंतर त्याने स्वतःची टोळी बनवून आपला धाक निर्माण केला.

अवघ्या २० वर्षाच्या वयात मात्तबर व्यक्तींच्या खुनाचा आरोप संदीप मोहोळ (Sandeep Mohol) यांच्यावर होता. या खूनसत्रांमुळे गुन्हेगारी क्षेत्रात संदीप मोहोळ (Sandeep Mohol) हा  आपल्या नावाचा  मोठा दबदबा निर्माण करत होता. त्याच्या या नावामुळे गुन्हेगारी क्षेत्रात तरुण आकर्षित होऊन गुन्हेगारीकडे वळले होते. अंगावर शुभ्र पांढरे कपडे बसायला स्कार्पिओ अशी त्याचे राहणीमान. गुन्हेगारी क्षेत्रात अल्पावधीत नाव कमावल्यानंतर संदीप मोहोळ याने राजकारणात आपला जम बसवण्यास सुरुवात केली. तो मुठा गावाचा बिनविरोध सरपंच झाला आणि राजकारणात दणदणीत यश मिळवण्यास सुरुवात केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडी कामगार युनिअन राज्य अध्यक्षपदी संदीप मोहोळ ची वर्णी लागली. जमिनीवरून होणाऱ्या सततच्या वादामुळे मोहोळ टोळी आणि मारणे टोळी मध्ये अनेक वाद होते.
Sandeep Mohol Photo

पौड रोड वरून जात असताना मारणे टोळीने संदीप मोहोळ (Sandeep Mohol) चा खून केला. अल्पावधीत नाव कमावलेल्या संदीप मोहोळ चा दुर्दैवी अंत झाला. मुठा गावापासून कोथरूड पर्यंत येई पर्यंत ५ वेळा गणेश मारणे टोळीने संदीप मोहोळ याच्यावर जीवघेणे हल्ले केले. त्यात सुटून येत असतानाच शेवटी पौड रोडवरील गणपती समोर त्याच्यावर गोळ्या घालून भरदिवसा हत्या करण्यात आली होती.

संदीप मोहोळ हत्येनंतर मोहोळ टोळीची सूत्रे शरद मोहोळ कडे गेली. संदीप मोहोळ च्या हत्येचा बदला त्याने किशोर मारणे ला मारून घेतला. संदीप मोहोळ याचे आई वडील आज हि कोथरूड भागात राहतात. त्याचे वडील आजही मार्केट यार्ड मध्ये काम करतात. आता बऱ्यापैकी गुन्हेगारी कमी झाली असून गुन्हेगारांवर चाप बसवण्यात पोलिसांना यश आले आहे. .

Reference: Khaas Re

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

दिवाळीत किल्ला का बनवतात?

Mulshi Pattern Teaser | Pravin Tarde, Mahesh Manjrekar, Mohan Joshi

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Reason in Marathi

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.