आजच्या घडीला मुंबई मध्ये मराठी माणसांची संख्या पाहता ती 70% वरून 23% च्या आसपास आली आहे. मराठी माणसांची मुंबई म्हणायला तिथे मराठी लोकं आहेत कुठे याचसाठी वेळे, सातारा येथील आराम हॉटेल चे मालक श्री. विजय यादव यांनी त्यांच्या तल्लख बुद्धीतून नवा प्रकल्प मांडला आहे.
महाराष्ट्रातील ३०,००० ग्रामपंचायतींच्या नावे मुंबईत किमान 2,००० चौरस फुटाचे घर शासनाने द्यावे . सुरुवातीस प्रत्येक जिल्ह्याचे एक भवन मुंबईत निर्माण करण्याने व्हावी तरच मराठी टक्का मुंबईत वाढेल व उद्याच्या महाराष्ट्रात मराठी माणुस दिसेल. या प्रकल्पाचा खर्च सुद्धा इमारतीतील गाळे विकून काढता येऊ शकतो याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला असून महाराष्ट्रातील बहुदा सगळ्या ग्रामपंचायतीला त्यांनी पत्रे पाठवून प्रकल्पाचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी विनंती केली आहे.
या प्रकल्पामुळे गावोगावातून मुंबईत जाणाऱ्या तरुणांच्या वास्तव्याचा प्रश्न मिटणार असून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बेरोजगारीवर सुद्धा आळा बसण्यास मदत होईल हे नक्की.
त्यांच्या या प्रकल्पाला सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा असून पुढील वाटचाल ही सरकार च्या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे.
या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी www.yashwantawas.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या