मुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे? काय सांगतेय आकडेवारी

0
मुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे? काय सांगतेय आकडेवारी
Share

मुंबई-पुण्याची कोरोना परिस्थिती सुधारली आहे का? जी मुंबई-पुण्यासारखी शहरे कोरोना रुग्णसंख्या साठी नवीन रेकॉर्ड दररोज प्रस्थापित करत होती तिथे आता कोरोना रुग्णसंख्या स्थिर व्हायला लागली आहे का? लॉकडाउन चा परिणाम झाला आहे का? असे अनेक प्रश्न आपणांस पडले असतील.

मुंबई-पुणे कोरोना परिस्थिती कशी आहे?

या आठवड्यात मुंबई-पुणे या शहरांमधील कोरोनाच्या बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून संसर्ग होणारी संख्या खालावली आहे. यामुळे एक आशादायक चित्र निर्माण झाले असून आत्ताच याबाबत अनुमान लावणे घाईचे होईल.

पुण्याची कोरोना परिस्थिती

पुणे पालिका कोरोना आकडेवारी

तारीखनवीन रुग्णबरे झालेलेचाचणी संख्या
20 एप्रिल 20215138680220204
21 एप्रिल 20215529653024409
22 एप्रिल 20214539485122277
23 एप्रिल 20214465563422962
24 एप्रिल 20213991478922227

20 एप्रिलला पुण्यात 5138 नवे रुग्ण आढळले, तर 6802 रुग्ण बरे झाले आहेत.

24 एप्रिलला पुण्यात 3991 नवे रुग्ण आढळले, तर 4789 रुग्ण बरे झाले आहेत.

हळूहळू बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.

मुंबई कोरोना परिस्थिती

मुंबई पालिका कोरोना आकडेवारी

तारीखनवे रुग्णबरे झालेलेसक्रिय रुग्ण
20 एप्रिल7214964183934
21 एप्रिल7684679084743
22 एप्रिल7410809083953
23 एप्रिल7221954181538
24 एप्रिल5888854978775

20 एप्रिलला मुंबईत 7214 नवे रुग्ण आढळले, तर 9641 रुग्ण बरे झाले आहेत.

24 एप्रिलला मुंबईत 5888 नवे रुग्ण आढळले, तर 8549 रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत सुद्धा हळूहळू बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.

लॉकडाउन चा फरक पडला?

काही दिवसांपूर्वी मुंबईत बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्यावर गेली होती, तर पुण्यातही ती 6 हजारांच्या पुढे होती. आता या आठवड्यात रोज नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर झाल्याचे चित्र असून सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे.

परंतु तज्ज्ञांच्या मते आत्ताच रुग्णसंख्या कमी होतेय हे म्हणणे घाईचे होईल. यासाठी मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE Funny Memes:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.