नागपंचमी चे महत्त्व: नागपंचमी का साजरी केली जाते?

0
नागपंचमी चे महत्त्व: नागपंचमी का साजरी केली जाते?
Share

नागपंचमी महत्व, नागपंचमी पूजा कशी करावी, नागपंचमी कथा, नागपंचमी माहिती मराठी, नागपंचमी शुभेच्छा, नागपंचमी मराठी निबंध

नागपंचमी महत्व, नागपंचमी पूजा कशी करावी, नागपंचमी कथा, नागपंचमी माहिती मराठी, नागपंचमी शुभेच्छा, नागपंचमी मराठी निबंध

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. श्रावण महिन्यात नागपंचमी हा पहिला सण आहे. श्रावण मासात विविध सण येतात त्यापैकी नागपंचमी यानंतर रक्षाबंधन, गोपाळकाला, नारळी पोर्णिमा हे सण हिंदू धर्मानुसार येतात. महाराष्ट्रात नागपंचमी सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. नागपंचमीला नवविवाहित मुली माहेरी जाण्याची परंपरा आहे. श्रावण मासातील खेळ खेळण्याची परंपरा यात सणाला आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.

नागपंचमी महत्व

श्रावण शुद्ध पंचमीला भगवान श्रीकृष्ण ने कालिया नागाचा पराभव केला करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले होते. त्या दिवसापासून नागपूजा करण्याची प्रथा प्रचलित झाली.

नागपंचमी कथा, नागपंचमी गोष्ट

एकदा एक शेतकरी जमीन नांगरत होता. नांगरताना नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला आणि बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेर अन्नाच्या शोधत गेलेल्या नागिणीला माघारी आल्यानंतर आपली पिल्ले मेल्याचे कळले आणि तिने रागाच्या भरात त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको-मुलांसह आपला दंश मारून मारले. शेतकऱ्यावर बदला घेण्यासाठी नागिणीने शेतकऱ्याची लग्न झालेल्या मुलीलाही मारण्याची शपथ घेतली. शेवटी शेतकऱ्याच्या मुलीला दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात मग्न होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवत होती. तिची मनोभावे भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली आणि तिने त्या मुलीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिल आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले. ही अशी आहे नागपंचमी कथा…

नागपंचमी पूजा कशी करावी?

नागपंचमी सण व्रत करून साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या सणांपैकी एक आहे. नागपंचमीला पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे. गावोगावी मातीचे नाग बनवून ती पूजण्याची प्रथा आहे. नागाला दूध, लाह्या यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी.

‘नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:!

वरील मंत्रोच्चार करत नागाची पूजा करावी. कालसर्प आणि सर्पदोष असणाऱ्यांना नागदेवतेची पूजा केल्यास प्रभाव दूर होतो. नागपंचमीदिवशी नागदेवता पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही, असे भविष्य पुराणात सांगितले गेलेले आहे. नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणापासून नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि शेंदूर लावत चिकटवावे. यामुळे सर्पभय राहत नाही.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.