अबब ! नागपुरात पेट्रोलचे दर ८२.८५ ₹ च्या घरात

0
अबब ! नागपुरात पेट्रोलचे दर ८२.८५ ₹ च्या घरात

तब्बल चार एक वर्षपूर्वी असेच पेट्रोल चे दर वाढल्याबद्दल भाजपने सर्व देशभर आंदोलने केली होती, पण आता पेट्रोलचे दर जवळ जवळ ९० च्या घरात जात असताना भाजपचे सर्व मंत्री चिडीचूप बसलेले असल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे.

सध्या साध्या पेट्रोलचे दर ८० ₹ च्या आसपास असून प्रीमियम पेट्रोल ८२-८३ ₹ दराने चालले आहे. जुलै महिन्यापासून तब्बल ७ ₹ ने पेट्रोल महागलेले असून क्रूड ऑइल च्या किमती ५० $ प्रत्येक बॅरल च्या आसपास आहेत. काँग्रेस च्या काळात क्रूड ऑइल तब्बल १०२ $ प्रत्येक बॅरल च्या वर गेले असता पेट्रोलचे दर ८० ₹ च्या खालीच होते. जवळपास एवढा मोठा फरक पडला असताना तरीही भाजपा सरकार पेट्रोलच्या दरात सतत वाढ करत आहे.
या दरवाढीमुळे जनतेच्या रोषाला सामोरे तर जावे लागतेयच पण हेच का ते “अच्छे दिन” असे प्रश्नही लोक विचारत आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.