नळ स्टॉप चौकातील डबल डेकर पुल उभारणीस सुरुवात, महामेट्रो खालोखाल वाहने धावणार…

0
नळ स्टॉप चौकातील डबल डेकर पुल उभारणीस सुरुवात, महामेट्रो खालोखाल वाहने धावणार…
Spread the love

पुणे :- कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील बहुचर्चित ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने सुरुवात केलेली आहे. अनेक दिवसांपासून या पुलाचा विषय चर्चेत होता. सध्या या पुलासाठी १५ खांबांची उभारणी पूर्ण झालेली आहे.

पुणे भागातील सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणजे वनाज-रामवाडी ची ओळख आहे. या मार्गावरील नळस्टॉप चौक सर्वाधिक गर्दीसाठी आधीच प्रसिद्ध आहे. या गर्दीचा विषय सोडवण्यासाठी या चौकात उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. मेट्रोमार्ग आणि खाली वाहतुकीसाठी रस्ता असा डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे.

मेट्रो कधीपर्यंत धावणार? पूल कधीपर्यंत पूर्ण होणार?

आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय यादरम्यान पुढील वर्षी मार्च अखेर मेट्रो धावणार आहे. या पुलावर आधी मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असून त्यासाठी सध्या १५ खांबांची उभारणी महामेट्रोने केलेली आहे. पुढील काम सुरू असून लवकरच या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली. 

नळस्टॉप उड्डाणपुलामुळे ट्रॅफिक होणार कमी

नळस्टॉप चौकातील सिग्नलवर लोकांना अनेकवेळ वाट बघत थांबावे लागत होते. नुकतेच कामानिमित्त रस्त्यावरील वाहतूक बदलण्यात आलेली होती. याआधी सिग्नल वर १२० सेकंद थांबावे लागत असे. आता या उड्डाण पुलामुळे वाहनचालक नळस्टॉप चौकात न थांबता थेट दशभुजा गणपती चौकापर्यंत जाऊ शकतात. एका चौकातील मोठी वाहन कोंडी यामुळे संपुष्टात येण्यास मदत होईल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.