नरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू

0
नरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे, तब्बल पाच वर्षांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून एटीएस पुढील तपास करत आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या तपास

नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने गजाआड धाडले आहे. नालासोपारा स्फोटकांचा तपास करताना सीबीआय तपास पथकाला संशयित शरद कळसकर याचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आल्यानंतर चौकशीअंती सचिनकडून दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे.

सचिन अंदुरे हा औरंगाबाद येथे अकाऊंटंट म्हणून काम करतो. सचिन अंदुरे ने हत्या केली, असा सीबीआयचा दावा आहे. जालना हुन सुद्धा श्रीकांत पांगारकर याला अटक झाली आहे, त्याचीही आता सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. जालना मधील सापडलेला संशयित गोळी झाडणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांपैकी एक आहे का याचा तपास सुरू आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Narendra Modi Net Worth The 14th Prime Minister of India: Wiki, Biography

शरद पवार यांचे कार्य: शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…

आरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.