नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेबांची भुमिका…..आज होणार चित्रपटाची घोषणा

0
नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेबांची भुमिका…..आज होणार चित्रपटाची घोषणा

Nawazuddin Siddiqui to play role of Balasaheb Thackrey in Next Movie tilted SAHEB

नवाजुद्दीन सिद्दीकी एक नावाजलेला अभिनेता, आपल्या अभिनयाचा कायम ठसा उमटवणारा एक कलाकार. नवाजुद्दीन वेगळ्या छाटणीच्या भूमिकांबद्दल चित्रपट उद्योगात प्रसिद्ध आहे. गँग ऑफ वासेपूरमध्ये एका धाडसी गँगस्टरची भूमिका करणारा, बजरंगी भाईजान मधला पत्रकार किंवा रईसमधील पोलिस अधिकारी नवाजुद्दीन यातल्या प्रत्येक पात्राला न्याय देत त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.
Photo Credit's
या वेळी नवाजुद्दीन एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या जीवनपटावर आधारित बनत असलेल्या चित्रपटात त्या व्यक्तिमत्वाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे…. जाणून घ्यायचेय ते व्यक्तिमत्व कोणते? अभिनेता नवाजुद्दीन हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर बनत असलेल्या चित्रपटात चक्क बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करणार असुन याबाबत सर्वजण चित्रपटाची सार्वजनिकरित्या घोषणा होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘साहेब‘ असल्याचे समजतंय.

२१ डिसेंबरला  म्हणजे आज त्याची अधिकृत घोषणा होणार असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले असून सर्व शिवसैनिक याबाबतीत उत्सुक आहेत.

तरीसुद्धा परप्रांतीयांना विरोध करत पक्ष घडवणाऱ्या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका परप्रांतीय नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत असल्याने काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी चा जन्म उत्तरप्रदेशातील बुधाना या गावातील असून एक परप्रांतीय बाळासाहेब यांची भूमिका साकारणार हे आपल्याला पटते का?
आम्हाला नक्की कळवा…. @PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.