राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? : शरद पवार

0
राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? : शरद पवार
Spread the love

अयोध्या राम मंदिर भूमिपूजन जवळ येत असल्याची बातमी येताच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रश्न विचारला आहे, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का? असे त्यांनी विचारल्याने वादाला तोंड फुटले आहे.

शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकार करत असलेल्या लगबगीवर टीका केली आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे बाजूला ठेऊन राम मंदिर भूमिपूजन यावर लक्ष दिले जात असल्याचे बोलत शरद पवार यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. मात्र, काही लोकांना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल. तेव्हा राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला. 

कोरोना प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लादले गेले. यात अनेकांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून त्याकडे राज्य व केंद्र सरकारने अधिक गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी सूचना शरद पवार यांनी केली. कोरोना पार्श्वभूमीवर शरद पवार आज सोलापूर जिल्हा कोरोना आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले होते.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.