नेहाने पोल डान्सचा हा काही पहिलाच व्हिडिओ शेअर केला नाही
प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पण आपल्या व्यग्र वेळापत्रकातूनही ती फिटनेसला तेवढाच वेळ देते. गेल्या कित्येक दिवसांपासून ती पोल डान्सचे वेगवेगळे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकांऊंटवर शेअर करत आहे. तिच्या अनेक व्हिडिओंपैकी सध्या हा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे.
नेहाला पोल डान्स करणे फार आवडते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना तिने लिहिले की, ‘खूप दिवसांच्या ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रेमाकडे जातेय. जेव्हा आपले शरीर सुदृढ असते तेव्हा चांगले फोटो येतात. ट्रेनिंग सुरू झालीये.’
नेहाने पोल डान्सचा हा काही पहिलाच व्हिडिओ शेअर केला नाही. याआधीही तिने पोल डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.
मराठीतली ही बोल्ड अभिनेत्री पारंपरिक वेषात जेवढी आत्मविश्वासाने वावरते तेवढाच आत्मविश्वास तिचा तोकड्या कपड्यांमध्ये वावरतानाही असतो. अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलेल्या नेहाने हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्येही काम केले आहे.
मराठी प्रेक्षकांना नेहा पेंडसे हे नाव नवे नसले तरी ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेमुळे ती अमराठी प्रेक्षकांच्याही घराघरात पोहोचली. संदीप आनंद आणि नेहाची यात मुख्य भूमिका आहे. या मालिकेत ती संजना नावाची व्यक्तिरेखा साकारते.
नेहाने १९९० मध्ये ‘हसरतें’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘मीठी- मीठी बातें’, ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. नेहाने आतापर्यंत मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे.