राजकुमार राव चा ‘Newton’ निघाला ऑस्कर वारीला…

0
राजकुमार राव चा ‘Newton’ निघाला ऑस्कर वारीला…

बॉलीवूड मध्ये एक काळ होता जेव्हा फक्त मोठया-मोठ्या महानायक यांचेच चित्रपट चालायचे. पण हळूहळू प्रेक्षक त्याच त्याच कथेला कंटाळून उत्कृष्ट अशा चित्रपटाकडे वळू लागले. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ‘Tubelight’ आणि ‘Jab Harry Met Sejal’ सारख्या चित्रपटाचे अपयश आणि ‘न्यूटन’ सारख्या चित्रपटाचे ऑस्कर ला निवड होणे.

नुकतेच चित्रपटाचा नायक राजकुमार राव याने ट्विटर वर याची घोषणा केली.

Critics ने चित्रपटाचे आधीच चांगले समीक्षन केले असून हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रक्षेपित झालेला आहे.
दिग्दर्शक अमित मासुरकर ने हा आनंद व्यक्त करताना ‘भारताला ऑस्कर मध्ये प्रतिनिधी म्हणून जाणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे’ अशी भावना व्यक्त केली.

हा चित्रपट छत्तीसगढ मधील नक्षली भागातील मतदानावर आधारित असून न्यूटन कुमार म्हणजेच राजकुमार राव ला तिथे ७६ लोकांचे मतदान घ्यायला पाठवले असता होणाऱ्या घटनांवर चित्रपट आधारित आहे.

न्यूटन ह्या चित्रपटाची निवड एकूण २६ चित्रपटातून करण्यात आली असून हा चित्रपट ऑस्कर नक्की गाजवेल अशी शुभेच्छा व्यक्त करूयात.

#Newton

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.