निर्भया दोषींची अखेरची ३० मिनिटं : फाशीच्या अर्ध्या तासापूर्वी तिहारमध्ये काय घडले?

0
निर्भया दोषींची अखेरची ३० मिनिटं : फाशीच्या अर्ध्या तासापूर्वी तिहारमध्ये काय घडले?

अखेर सात वर्षाच्या लढ्यानंतर निर्भया ला न्याय मिळाला, २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता चारही दोषींना फाशी देण्यात आली. फाशी टाळण्यासाठी आरोपींकडून अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु अखेर निर्भया ला न्याय मिळाला आहे.

फाशीच्या आधी अर्धातास सुद्धा दोषींनी फाशीपासून वाचण्याचे अनेक प्रयत्न केले. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींना आपला शेवट दिसायला लागला आणि त्यांनी रडारड सुरू केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचा देखील प्रयत्न केला. न्यायव्यवस्थेने अखेर निर्भया ला न्याय देत अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चारही दोषींना फाशी देण्यात आली.

तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. तिहार तुरुंगात एकाच वेळी चारही जणांना फाशी देण्याची पहिलीच वेळ होती. फाशी देण्यासाठी तिहार तुरुंग क्रमांक तीन या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते. मेरठहून आलेल्या जल्लाद पवन यांच्याकडे यातील एक खटका होता, तर दुसरा जेलच्या स्टाफकडे.

पहाटे ३.१५ वाजता चारही दोषींना उठवण्यात आले. अखेरचा दिवस असल्यान त्यांच्यातील कोणीही झोपले नव्हते. नियमानुसार त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा मागवण्यात आला आणि शेवटची इच्छा विचारण्यात आली. चौघांनाही पांढरे कपडे परिधान करण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. फाशी घरात घेवून जात होते यावेळी एक दोषी प्रचंड घाबरून तिथेच लादीवर लोळून राहिल, त्याने पुढे जाण्यास नकार दिला. परंतु पोलिसांनी त्याला फाशी घरापर्यंत नेले. नंतर चौघांच्या डोक्याला काळ्या कपडा टाकून झाकण्यात आले. आणि अखेरीला जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लाद याने खटका खेचत चारही दोषींना या जगातून मुक्त केले. अखेरीस निर्भया ला न्याय मिळाला.

७ वर्षे, ३ महिने आणि ३ दिवस न्याय मिळण्यासाठी गेले.

It took 7 yrs for justice to be delivered. Today, we’ve to take a pledge that a similar incident does not happen again. We’ve seen how the convicts manipulated the law until recently. There are a lot of loopholes in our system, we need to improve the system.” 

Delhi CM Arvind Kejriwal

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.