बॉक्स ऑफिसवर सलग चार हिट्ससह जबरदस्त सुरुवात करणाऱ्या अक्षय कुमार च्या अडचणीत भर पडली आहे. आपल्या ताज्या जाहिरातीमुळे तो कायदेशीर अडचणीत सापडला आहे. निरमा वॉशिंग पावडर च्या एका जाहिरातीमध्ये मराठी संस्कृती आणि मराठा मावळ्यांची चेष्टा करण्याबद्दल त्याच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे.

निरमा डिटर्जंट च्या जाहिरातीत शत्रूंचा पराभव करून आपल्या राज्यात परत आलेल्या मराठा योद्धाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. या जाहिरातीत मावळे आणि महाराजांच्या रुपात अक्षय कुमार युद्धावरून मळलेले कपडे घालून येतो, त्यावरून त्याची बायको त्यांना विचारते की कपडे कसे स्वच्छ करणार. यावर चित्रविचित्र डान्स करत कपडे धुताना दाखवले आहे.
महाराष्ट्रात यावरून अनेकांनी अक्षय कुमार ने माफी मागण्याची मागणी केली आहे. #ApologizeNirma #ApologizeAkshay #BoycottNirma असे हॅशटॅग वापरून अनेकांनी अक्षय कुमार आणि निरमा वॉशिंग पावडर वर आपली नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणी सूर्यकांत जाधव आणि आणि विजय कदम यांनी वरळी पोलिसांकडे (Worli Police) लिखित नोंदवली आहे. समाज भान असणाऱ्या अभिनेत्याने असे वागणे गैर असल्याचे म्हणत अक्षयने महाराजांची माफी मागावी अशी मागणी सध्या समोर येत आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद