Nisarga Cyclone Live Location: निसर्ग चक्रीवादळ आत्ता कुठे आहे? पाहा

0
Nisarga Cyclone Live Location: निसर्ग चक्रीवादळ आत्ता कुठे आहे? पाहा

निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) चा फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना बसणार आहे. हवामान खात्याने (Cyclone Nisarga live Location) सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी एनडीआरएफ पथके तैनातकेली आहेत. समुद्र किनाऱ्यावरील गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Nisarga Cyclone Live Location

वरील नकाशा मध्ये आपण निसर्ग चक्रीवादळ लाईव्ह पाहू शकता. Nisarga Cyclone पुढे कोणत्या दिशेने जाईल याबाबत सुद्धा या नकाशात आपण पाहू शकता.

Nisarga Cyclone Live Update

मुसळधार पाऊस आणि वारा सुटल्याने फेडरल कार्गो विमानाने धावपट्टी सोडल्याने मुंबई विमानतळ कारवाई दुपारी अडीच ते सायंकाळी सात दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.

03.45PM

चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी, सध्याच्या वाऱ्याची दिशा पाहता मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल, मात्र चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही

श्रीनिवास औंदकर, हवामान तज्ज्ञ
03.00 PM

निसर्ग वादळ सकाळी रत्नागिरी किनारपट्टीलगत सरकले आहे. या वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर असा आल्याने विविध ठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, रस्ते बंद होणे अशा घटना घडल्या आहेत.

02.00 PM

चक्रीवादळ हवामान विभाग अंदाज

महाराष्ट्र आणि कर्नाटकी राज्यांमध्ये 3 आणि 4 जून या दिवशी राज्यात तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनाऱ्यालगत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मोसमी वारे प्रतिताशी 45 ते 55 किमी वेगानं वाहणार असून ते अरबी समुद्राच्या आग्नेय आणि मध्य-पूर्व भागात प्रतिताशी 65 किमी वेगानं वाहायला लागतील. असा अंदाज हवामान विभाग ने वर्तवला आहे.

चक्रीवादळ वेळी काय काळजी घ्याल?

  • बॅटरीवर चालणाऱ्या आणि राखीव पॉवरच्या यंत्रांचे परीक्षण करा.
  • आपात्कालीन वेळ साठी उपयोगी वस्तूंची किट एका बॅग मध्ये तयार ठेवा.
  • महत्वाची कागदपत्रे प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवा.
  • पिण्याच्या पाण्याची सोया करून ठेवा.
  • बातम्या पाहत राहा आणि त्यावरील सूचनांचे पालन करा
  • घराबाहेर असलेल्या पत्रे, हलक्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवा.
  • विद्युत उपकरणे सुरक्षित असल्याची खात्री करा
  • गरज लागल्यास सरकारी यंत्रणेला संपर्क करा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.