लाडका आज्या म्हणजेच नितीश चव्हाण चा प्रेक्षकांना भावनिक निरोप

0
लाडका आज्या म्हणजेच नितीश चव्हाण चा प्रेक्षकांना भावनिक निरोप

लाडका आज्या म्हणजेच नितीश चव्हाण चा प्रेक्षकांना भावनिक निरोप

Laagir Zhal Jee poster

“लागिरं झालं जी” बघा ना नावातच लागिरं आहे.
“लागिरं झालं” याचा अर्थ “झपाटलं”असा होतो
२ वर्षांपूर्वी या मालिकेचा प्रवास सुरु झाला होता आणि आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय सिरीयल बंद करू नका, आता आम्ही ७ वाजता कुणाला बघायचं, तुमच्यामुळे आम्ही टिव्ही बघायचो, तुमच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळायचं, सिरीयल बंद झाली तर मी जीव देईन,वगैरे वगैरे.
याला सगळ्याला काय म्हणायचं?
याच एकच उत्तर आहे “झपाटलं” म्हणजेच “लागिरं झालं”
आज संपूर्ण महाराष्ट्राला या मालिकेचं
“लागिरं झालंय” असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
काल दिवसभर मला कॉल्स,मेसेजेस,कमेंट्स येत होते ते बघून
अश्रू अनावर झाले. असं वाटत होत कि कस काय कोणी एवढं प्रेम करू शकत आपल्यावर ना आपलं रक्ताचं नातं आहे ना आपण समोरासमोर कधी भेटलोय.पण नंतर लक्षात आलं हे “आज्या” वरच प्रेम आहे.

Nitish Chavan Laagir Zhal Jee
“अजिंक्य” मित्रा खरंच तुझे मनापासून धन्यवाद????.
आज हा नितिश जे काही आहे ते “अजिंक्य(आज्या)”मित्रा तुझ्यामुळेच. तू मला आज्जीच प्रेम दिलस,तू मला नात्यांची शिकवण दिलीस,तू मला दोस्ती कशी निभवायची असती हे सांगितलंस,आपल्या जवळच्या माणसावर प्रेम कस करायचं असत हे दाखवलंस, तू मला देशसेवेची जाणीव करून दिलीस,तू मला आर्मीची शिस्त लावलीस आणि तू मला संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरून प्रेम दिलस मित्रा खरचं तुझे आभार मानायला शब्द अपुरे पडतील.
“लागिरं झालं जी” हि एक अशी मालिका जिने टेलिव्हिजन मध्ये इतिहास घडवला आणि जी कायम अजरामर राहील.
या मालिकेचा मी एक भाग होतो याचा मला अभिमान वाटतोय आणि मरेपर्यंत वाटत राहील.
या नितिश चा कधी अजिंक्य झाला आणि अजिंक्यचा तुम्ही कधी “आज्या” केला कळालच नाही.आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या जीवापाड प्रेमामुळे??
मायबाप रसिक प्रेक्षक आमच्या संपूर्ण लागिरं टीमवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद असेच राहुदेत??
Heartly thanks to the team working behind camera

इंडियन आर्मी आणि मराठा बटालियन यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे विशेषतः आभार ????

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा?
वंदे मातरम् ??
जय हिंद ??

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्कूटर ला DSP चा मुलगा ऑडी ने ठोकतो !

दिवाळीत किल्ला का बनवतात?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.