No Horn Day: पुणे शहर 12 सप्टेंबरला साजरा करणार No Horn Day

0
No Horn Day: पुणे शहर 12 सप्टेंबरला साजरा करणार No Horn Day

पुणे: शहर 12 सप्टेंबरला ‘No Horn Day‘ साजरा करणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर वाहतूक पोलिसांनी गाडी चालकांना आवश्यक असल्यासच हॉर्न वाजवण्याचे आवाहन केले आहे.

या मोहिमेच्या पुढाकारातून अनावश्यक हॉर्न वाजवण्याबद्दल वाहनचालकांना सुसंस्कृत केले जाईल.
एका अंदाजानुसार, एक वाहनचालक दिवसातून किमान 5-10 वेळा हॉर्न वाजवतो. शहराच्या रोजच्या वाहनांची संख्या लक्षात घेता, दिवसातून एक कोटी वेळा हॉर्न वाजवले जातात.

तेजस्वी सातपुते पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांनी सांगितले की, 11 आणि 12 सप्टेंबरला शहरातील आवाजाची पातळी मोजली जाणार आहे. यानुसार No Horn Day चा उद्धिष्ट साध्य झाले का हे समजण्यास मदत होईल. वाहतूक पोलिसांनी आवाजाची पातळी गाठणार्या हॉर्न विरुद्ध मोहीम सुरू केली असून नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

“नगरसेवक हरवले आहेत” पुणेकरांच्या बँनरबाजीमुळे शहरात चर्चा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.