नोकिया चा सर्वात स्वस्त फोन

0
नोकिया चा सर्वात स्वस्त फोन

नोकिया ३, नोकिया ५, नोकिया ६ आणि अलिकडेच नोकिया ८ नंतर आता कंपनी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. नोकिया २ असे या फोनचे नाव असल्याचे समजते. मंगळवारी त्याचे लाँचिंग होणार आहे. पण त्याआधीच त्याच्या फिचर्सची माहिती उघड झाली आहे.

http://www.antutu.com या चिनी वेबसाईटवर एक यादी जाहीर झाली त्यात नोकियाच्या या फोनचे स्पेसिफिकेशनही होते. TA1035 नावाच्या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१२ चिपसेट असेल. अगदी सुरुवातीच्या पातळीवरील स्मार्टफोनमध्ये हे प्रोसेसर असते. हा फोन नोकिया ३ पेक्षा थोड्या कमी फिचर्सचा असेल. नोकिया ३ भारतात ९,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. काही रिपोर्ट्सनुसार, नोकिया २ हा नोकिया ३ पेक्षा खूप स्वस्त असेल.

नोकिया २ ची वैशिष्ट्ये अशी असतील –

१ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज
> 8MP बॅक कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा
> ४.७ ते ५ इंच डिस्प्ले
> 4000mAh बॅटरी

सध्याच्या काळात हा स्मार्टफोन कोणी घेईल का हे बघावे लागेल…
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.