पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन मेजर कुमूद डोगरा आल्या आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला
आसाम मध्ये १५ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट्स शहीद झाले, त्यापैकी एक होते विंग कमांडर डी वत्स. देशाने दोन शूरवीर गमावले. घरातला व्यक्ती गेल्यावर मनाला काय वाटते हे कोणाला सांगायची गरज नाही.
परंतु नुकतीच मन हेलावणारी आणि रडवणारी घटना घडली आहे. विंग कमांडर डी वत्स यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या पाच दिवसांच्या नवजात बाळासोबत अंत्यसंस्काराला पोहचली आणि सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. बाळाला कवेत घेऊन अंत्यसंस्कारासाठी पोहचलेल्या या महिला लष्कर अधिकाऱ्याला पाहून उपस्थितांची छाती अभिमानाने फुलली होती.
एकीकडे मुलगी जन्मल्याचे सुख तर दुसरीकडे भाग्य गेल्याचे दुःख. आपल्या पतीच्या निधनाने खचून न जाता मातेने आपल्या पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेत लष्करी पेहरावात आपल्या पाटील मानवंदना दिली. मेजर कुमूद डोगरा स्वत: लष्करात अधिकारी आहेत.
नुकतेच बाळाच्या आगमनाच्या आनंदात असताना त्यांच्या घरावर संकट कोसळले असतानाही मेजर कुमूद डोगरा डगमगल्या नाहीत यावरून सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
ऐतिहासिक वाचण्यासाठी:
शिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे