‘ओखी’ चक्रीवादळाच्या नावामागची रंजक गोष्ट..

0
‘ओखी’ चक्रीवादळाच्या नावामागची रंजक गोष्ट..

‘ओखी’ चक्रीवादळाच्या नावामागची रंजक गोष्ट
Photo Credit's

◾️केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप भागात थैमान घातल्यानंतर ओखी चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकले आहे. याचा परिणाम मुंबईतही जाणवू लागला आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. तर नवी मुंबईमध्ये जोराचा पाऊस झाला. पुण्यातही पाऊस येऊन गेला, सगळीकडे ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या २४ तासांत आणखी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार सकाळपासून ओखी वादळाची तीव्रता कमी झालेली असून सर्वत्र वातावरण सामान्य होईल असा अंदाज आहे.

 

?’ओखी’ नाव आलं कुठून?

 

?’ओखी’चा बंगाली भाषेत अर्थ होतो डोळा. बांगलादेशनं या चक्रीवादळाला ओखी असं नाव दिलं आहे.

? २००० पासून उष्णकटिबंधीय वादळांना नाव देण्याची पद्धत रुढ झाली आहे. हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ म्हटलं जातं. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर ओखी चक्रीवादळात झालं आहे.

 

☑️नाव देण्याची पद्धत कशी असते?

 

?जसं हे वादळ जागा बदलतं तसं या चक्रीवादळांना वेगवेगळं नाव दिलं जातं. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या आठ देशांनी वादळांची नावं ठरवली आहेत. भारताकडून ‘अग्नी’, ‘आकाश’, ‘बिजली’, ‘जल’, ‘लहर’, ‘मेघ’, ‘सागर’ आणि ‘वायू’ अशी आठ नावं सुचवली गेली. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावं देण्यात आली. ही नावं ओळीनं देण्यात येतात. याच पद्धतीनं पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावं ठरवली जातात.
बांद्रा-वरळी सी लिंक च्या नावाखाली ओखी चक्री वादळाचा सांगत जुना व्हिडिओ झाला सर्वत्र वायरल …

? विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.

 

?यापूर्वी चक्रीवादळाचं नाव काय होतं?

 

यापूर्वी ओखी या चक्रीवादळाचं नाव ‘मोरा’ होतं. हे नाव थायलंडकडून देण्यात आलं होतं. ओखीचं पुढचं नाव हे ‘सागर’ असेल. हे नाव भारताकडून या चक्रीवादळाला देण्यात येईल.
Photo Credit's

 

? चक्रीवादळांना नाव कधी दिले जाते?

 

♻️ जेव्हा समुद्रात गोलाकार आकाराची हालचाल सुरु दिसते आणि त्या जागी असणाऱ्या वाऱ्याचा वेग जेव्हा ताशी ३९ मैल इतका प्रचंड असतो, तेव्हा  समुद्री वादळ येत असल्याचे हवामान खात्याच्या निदर्शनास येते. जेव्हा वाऱ्याचा वेग हा ताशी ७४ मैल पर्यंत वाढतो तेव्हा समुद्री वादळाचे चक्रीवादळात रुपांतर होते. तेव्हा यादीनुसार येणाऱ्या चक्रीवादळाला नाव दिले जाते.

? चक्रीवादळांच्या नावांच्या याद्या जगभरातील मुख्य महासागरांनुसार विभागण्यात आल्या आहेत. सध्या अटलांटिक महासागरासाठी सर्वात जास्त म्हणजे ६ याद्या उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी एका यादीचा वापर केला जातो.

अरबी समुद्रात होणार भुकंप; भारतासह 11 देशांना बसणार फटका

❗️ अश्याप्रकारे दर ६ वर्षांनी या याद्या फिरत असतात. म्हणजेच २०१६ मध्ये वापरात आलेल्या नावांची यादी २०२१ मध्ये पुन्हा वापरण्यात येईल. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या चक्रीवादळामुळे संपत्तीचे आणि जीवांचे काही नुकसान झाले तर त्या चक्रीवादळाचे नाव यादीतून कायमचे हद्दपार करण्यात येते. असे यासाठी करण्यात येते कारण त्या चक्रीवादळाचे नाव पुन्हा दुसऱ्या चक्रीवादळाला दिले गेले तर त्यामुळे गोंधळ होऊ शकतो.

♻️दुसरे कारण म्हणजे चक्रीवादळाची घटना ठराविक नावाने जगाच्या इतिहासात नोंदवली जावी हा त्यामागचा उद्देश असतो. उदा. २००५ मध्ये अमेरीकेच्या न्यू ऑरलेन्समध्ये आलेल्या चाक्रीवादळाला ‘कतरिना’ नाव देण्यात आले. या चक्रीवादळामुळे भयंकर नुकसान झाले होते.

?आता हे नाव पुन्हा कधीही कोणत्याच चक्रीवादळासाठी वापरण्यात येणार नाही. ओखी म्हणजे बंगाली भाषेत डोळा..बांगलादेशने हे नाव दिले होते.पुढील वादळाचे नाव भारत “सागर” असे देईल. पण पुन्हा अशी वादळे येऊ नयेत अशीच प्रार्थना सर्वजण करीत आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.