नोटबंदी होऊन वर्ष गेले तरीही जुन्या नोटांचं घबाड काही संपताना दिसत नाही. कानपूरमध्ये तब्बल १०० कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. या १०० कोटींच्या नोटा गादीमध्ये सापडल्या असुन पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.
पैशांनी भरलेल्या तीन गाद्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून एक बिल्डर आणि कपडे व्यापाऱ्याच्या घरातून या नोटा हस्तगत केल्या गेल्या आहेत. एनआयए आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करुन ही कारवाई केली आहे. अजुन किती जुन्या नोटा छापेमारीत मिळतायेत हे पहावे लागेल. नोटबंदीनंतर लोकांनी गंगा नदीत तर काहींनी देवाच्या दानपेटीत जुन्या नोटा टाकल्याचे उघड झाले होते. आता हे पाहून आश्चर्य वाटायला नको.
©PUNERISPEAKS
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
For More: