लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्या वरील एका पुलाचा जुना व्हिडिओ आज आलेल्या चक्री वादळाच्या नावाखाली मुंबई येथील आहे असा सांगत सर्वच सोशल मिडिया माध्यमातून वायरल होत आहे. खरे तर हा व्हिडिओ जुना आहे व तो मुंबई चा नाही..
The video is flying across on a day when the city of Mumbai has seen unseasonal rainfall in December brought on by Ockhi.
हा व्हिडिओ WhatsApp, Facebook व Twitter वर आज दिवसभर शेअर केला जात आहे. कारण पाऊस चा मौसम नसताना मुंबई मध्ये पाऊस पडत आहे. ओखी चक्रीवादळ सर्वच प्रसार माध्यमात खूप वाढवून सांगीतले गेल्यामुळे लोकही हा व्हिडिओ सर्वत्र वायरल करत आहेत.
व्हिडिओ मागील सत्य:
एकावेळी हा व्हिडिओ बांद्रा वरळी सी लिंक म्हणून वायरल होत आहे…
त्याचवेळी हाच व्हिडिओ Goa’s Kolva beach च्या नावाखाली सर्वत्र खपवत होते.
या व्हिडिओ मध्ये पुलावर दोन इसम असल्याचे दिसत आहे. त्यातील एक समुद्राच्या लाटा वाढत गेल्यावर पळत असताना दिसत आहे व दुसरा व्यक्ती दुचाकीवर आहे व तो त्वरित तिथून निसटण्याचा प्रयत्न करीत आहे.
महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ वायरल केला जात आहे तेव्हा त्यातील बारीक गोष्टींवर कोणाचे लक्षच गेले नाही. आला कि पुढे पाठवा एवढेच काम चालू आहे. तो मुंबई चा आहे कि नाही हे सुद्धा पहिले नाही.
१. दुचाकीला बांद्रा वरळी सी लिंक वर मनाई आहे.
२. मोठी पांढऱ्या रंगाची केबल केव्हाही ओळखून येईल अशी आहे ती यात दिसत नाही.
आणि सर्वात महत्वाचे हा व्हिडिओ YouTube वर २४ ऑगस्ट २०१७ चा अपलोड केलेला आहे. आणि त्याचे नाव ‘Minicoy Eastern Jetty, Rough Seas.’ असे आहे.