चिंचवड: गेले चार पाच दिवस झाले सर्व पुणे – महाराष्ट्रभर Whatsapp एक फोटो फिरत होता ज्यात आई आणि मुलाचा फोटो होता आणि लिहिले होते बेपत्ता… दिसल्यास कळवा….
मदत पाहिजे!
संदीप खरात, पूर्णा नगर चिंचवड
यांच्या सात वर्षाच्या मुलाला घराच्या जवळून नेले आहे.
?पराग 9422265821
8208584450
Retweet/Share pic.twitter.com/ghqoUG3AVx— अस्सल पुणेरी ™ (@PuneriSpeaks) September 24, 2017
संपूर्ण पुण्यात या घटनेनंतर एक निपचित शांतता पसरली होती आणि मुलांच्या सुरक्षेततेची भीती पालकांना वाटायला लागली होती.
पण कालच या मुलाची सुटका करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि हे मोलाचे कार्य पुणे पोलिसांनी केले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पूर्णानगर, निगडी येथून अपहरण झालेल्या ओम ची सुटका @PuneCityPolice नि केली,
यावेळी @PuneCityPolice चे आभार त्याच्या वडिलांनी मानले. pic.twitter.com/SmnltHvcF5— अस्सल पुणेरी ™ (@PuneriSpeaks) September 26, 2017
रोशन शिंदे आणि अक्षय जामदारे असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी कट रचून ओमचे अपहरण केले होते.
रोशन शिंदे हा काही दिवसांपूर्वी ओमच्या वडिलांकडे डिलिव्हरी बॉय चे काम करायचा त्यामुळे त्याला ओमच्या घरचे सर्व माहीत होते. त्याने नुकतेच सावकारी कर्ज काढून ड्राइविंग स्कूल काढले होते. पण सावकाराच्या व्याजाने आणि ड्राइविंग स्कूल च्या अपयशाने रोशन शिंदे डबघाईला आला होता. त्याचा मित्र रोशन सुद्धा पैशाच्या अडचणीत होता आणि यातूनच त्यांना हा अपहरणाचा कट सुचला. गणपतीच्या काळात त्यांनी संपूर्ण कट रचून २३ सप्टेंबर ला ओम खरात पूर्णानगर, चिंचवड मधून मित्रांबरोबर खेळत असताना अपहरण केले. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून त्याला गेवराई(बीड) येथे घेऊन गेले आणि तेथून ते माघारी पुण्याच्या आसपास फिरू लागले. ओमला त्यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवले होते आणि स्वतः गाडी चालवत फिरत होते. पोलीस मागावर असल्याचा संशय येताच त्यांनी ओमला सोडून देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी ओम खरात च्या घरच्यांना ६० लाखाची मागणी केली होती.
पुणे पोलिसांनी तब्बल ४०० जणांची टीम या शोधमोहिमेवर लावली होती आणि दिवसरात्र या मोहिमेवर काम चालु होते. शेवटी मोहीम यशस्वी झाली आणि ओमची सुटका झाली.
पुणे पोलिसांच्या कार्याला सलाम??