घरपोच दारू मिळवण्यासाठी दारू पिण्याचा परवाना आवश्यक, परवाना कसा मिळवाल?

0
घरपोच दारू मिळवण्यासाठी दारू पिण्याचा परवाना आवश्यक, परवाना कसा मिळवाल?

लॉकडाऊन 4 सुरू होत असून सरकारने आता घरपोच दारू विक्रीस परवानगी दिलेली आहे. महाराष्ट्रात मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट नुसार दारू पिण्यासाठी लायसन्स लागते. घरपोच दारू मिळण्यासाठी सुद्धा सरकारने दारू पिण्याचा परवाना अनिवार्य केला आहे.

दारू पिण्याचा परवाना नसल्यास?

दारू पिण्याचे लायसन्स महाराष्ट्र

कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. जर विना परवाना दारू प्यायलेला व्यक्ती पोलिसांना सापडल्यास त्या व्यक्तीस कायदेशीर अटक होऊ शकते. हा दंडनीय अपराध असून त्या व्यक्तीस शिक्षा सुद्धा होऊ शकते. परवाना मिळवण्यासाठी 21 वर्षे वयोमर्यादा आहे. दारू पिण्याचे लायसन्स नसल्यास त्यास दारू विक्री न करण्याची सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.

दारू पिण्याचा परवाना कालावधी

दारू पिणाऱ्यांना परवाना बंधनकारक असून तो परवाना 1 दिवस, 1 वर्ष आणि आजीवन अशा तीन प्रकारे मिळवता येतो. परवाना मिळण्यासाठी 7 दिवसांचा अवधी लागू शकतो.

दारू पिण्याचा परवाना कसा मिळवाल?

www.stateexcise.maharashtra.gov.in

www.exciseservices.mahaonline.gov.in

या संकेतस्थळावर आपल्याला दारू पिण्याचा परवाना (लायसन्स) मिळू शकते. 1 दिवसाचा परवाना मिळवण्यासाठी 5 रुपये खर्च येतो. 1 वर्षाचा परवाना मिळवण्यासाठी 100 रुपये खर्च येतो आणि आजीवन दारू पिणे परवाना मिळवण्यासाठी 1000 रुपये खर्च आहे. उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात आणि ऑनलाइन अशा दोन प्रकारे परवाना मिळवू शकता.

परमिट रूम, वाईन शॉप किंवा जेथून मद्यविक्री होते अशा सर्व ठिकाणी 1 दिवसाचा दारू पिण्याचा परवाना मिळण्याची व्यवस्था उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. त्यासाठी 21 वर्षे वयोमर्यादा आहे.

दारू पिण्याचे लायसन्स मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • फोटो आणि सही
  • वय सिद्ध करणारे कागदपत्रे (पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र)
  • रहिवास सिद्ध करणारी कागदपत्रे (पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र)

कुठली दारू घरपोच मिळेल?

  • भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरिट्स (IMFL)
  • बीअर
  • सौम्य मद्य
  • वाईन

परवाना मिळालेल्या व्यक्तीला 750 मिली च्या दोन दारूच्या बाटल्या बाळगण्याची आणि वापरण्याची परवानगी आहे.अनेकवेळा मद्याचा परवाना काढणे म्हणजे समाजात वेगळीच प्रतिमा निर्माण होईल, अशी भीति अनेकांच्या मनात असते. परवाना काढण्यास कार्यालयात जाण्यास अनेकजण संकोच करत असतात. आता हा परवाना ऑनलाइन मिळत असल्याने आपल्याला एका क्लीक वर परवाना मिळत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.