पिंपरी-चिंचवड महापालिका माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक दत्ता साने यांचे वयाच्या 54 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी सकाळी चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात निधन झाले आहे.
दत्ता साने यांच्यावर 25 जून पासून उपचार सूरु होते. ते चिखली मधून तीन वेळा पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
लॉकडाउन महिन्यात त्यांनी अनेकांना मदत केली होती, यावेळी अनेकांशी संपर्क आल्याने त्यांना कोरोना लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात सर्वानाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.
अजुन वाचण्यासाठी:
- पिंपरी चिंचवड: आजचे प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस.
- Containment Zone in Pune, Pune Area Wise Corona Cases