बैल: एक वैचारीक विषय

0
बैल: एक वैचारीक विषय

बैल: एक वैचारीक विषय

काही दिवसांपुर्वीच मि साताञ्यामध्ये शाहु कला मंदीर नाट्यगृहात ला गेलो होतो. आपल्या सातारचे लेखक राजीव मुळे यांनी लिहलेलं प्रसिद्ध असं “बैल” नाटक पाहण्यासाठी.लोकरंगमंचच्या सर्व सातारकर कलाकारांचा काय तो अभिमानास्पद अभिनय…. मस्तच ! त्याच दिवशी ठरवलं होत यांवर पण आपण कधीतरी लिहायचंच & बैल या शब्दाकडे लोकांचा बघायचा दृष्टीकोन बदलायचां. आपणंच “बैल” या शब्दाला नाव ठेवतो. आपण भोळ्या स्त्रीला ‘गरीब गाय’ म्हणतो & खुळचट माणसांला ‘बैल’ अस्सं का बर ?

माझं कसं हाय माहीते का ? मला लहानपणांपासुन जरा हटके पदधतीनं विचार करायची सवय हाय. बैलाच्या बाबतीत पण मला नेहमीच वाटतायचं की आपण त्याच्यावर अन्याय करतो. आत्ता ते कस्सं ? थांबा की सांगतो…! आता बुद्धिबळ माहीते ना बुद्धिबळ त्यात दोन्ही कडेला हत्ती असतो , त्याच्या शेजारी घोडा असतो आणि त्याच्या थोड शेजारी तो उंट पण असतो. बुद्धिबळ खेळताना मला नेहमी असं वाटायचं. च्या मारी ! मग ह्या खेळात “बैल” का नसतो ? इथे वास्तविक बैल पण पाहीजे की ओ कारण या सगळ्यां पेक्षा जास्त कष्ट करनारा & जास्त राबनारा प्राणी तोच आहे मग तरी पण अस्सं का ?.

बैल शब्दालाच आपण किती नाव ठेवतो.आता तुम्हीच बघाकी आपण एखाद्याला नुसतं “बैल” असं म्हटलं कि त्याला लगेच राग येतो. मि काय म्हणतो राग यायचा कारणच काय. तुम्ही “बैल” या शब्दाकडं चांगल्या अर्थानं बघतंच नाय. आत्ता ते कस्सं ? शेतात आपला बैल बघा किती मालकाचा मार सहन करतो , शेतात उन्हात राबराब राबतो, स्व:ताच्या खांद्यावर आयुष्यभर तो नांगर वाहुन शेतकञ्याच्या आयुष्याचा खांदा बनतो. मग जर कोण आपल्याला “बैल” म्हटलं तर त्याचा अर्थ आपण सहनशक्ती किंवा कष्टाळु असा का घेत नाही ? खरंच आपण विचार बदलले पाहजेत बरकां

आजकाल शेतकञ्यांकडे ट्रँक्टर कितीही आले तरी खरंच “बैल” चं आपल्याला नेहमी स्वाभिमान & प्रामाणिक पणा कसा आसावा ? हे वारंवार शिकवतो….

लेखक – प्रेम शंकरराव भोसले

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पतंगराव कदम माहिती, राजकीय कारकीर्द, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, सहकार क्षेत्र कार्य, पुरस्कार, Patangrao Kadam Biography

लेनिन कोण होता? डाव्यांना लेनिन चा पुळका का?

नोकरीवाला नवरा नको ग बाई

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.