ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेकाने विकसित केलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लस अंतिम क्लिनिकल चाचण्या ब्रिटन मध्ये थांबवण्यात आल्या आहेत. लस चाचणी केलेल्या व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे जाणवल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.
अॅस्ट्रॅजेनेकाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की “न समजलेले आजार” झाल्यास हे चाचणी थांबवणे हे नियमित घडामोडी मध्ये येते. यामुळे सध्या चाचण्यांवर पूर्ण विराम देण्यात आला आहे.
जगभरातून या लसीच्या चाचण्यांचा परिणाम बारकाईने पाहिला जात आहे. अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लसीला जागतिक स्तरावर विकसित होणार्या अनेक लस मधून सर्वात मजबूत दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
पहिल्या 2 टप्प्यात झालेल्या यशस्वी परीक्षणानंतर लस बाजारात येण्याची आशा पल्लवित झाली होती. गेल्या काही आठवड्यांमध्ये 3 ऱ्या चाचणी परिक्षणाला अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली होती. यात सुमारे 30,000 लोकांवर परीक्षण सुरू आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लस च्या विकसकांनी काय म्हटले?
जगभरात या लसीचे सुरू असलेले परीक्षण काही काळासाठी बंद ठेण्यात येणार आहे. संपूर्ण आकडेवारीचा आढावा घेऊनच सुरक्षितरीत्या पुढील चाचण्या सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
“मोठ्या चाचण्यांमध्ये योगायोगाने आजारी पडणे शक्य आहे परंतु प्रत्येक लस घेतलेल्या व्यक्तीची काळजीपूर्वक तपासणी करण्यात येऊन स्वतंत्रपणे त्याचा आढावा घ्यावा लागेल”
ऑक्सफोर्ड कोरोना व्हायरस लसीची चाचणी दुसऱ्यांदा थांबवण्यात आली आहे. अशा घटना मोठ्या चाचण्यांमध्ये नेहमीच्या असतात आणि जेव्हा एखाद्या लस घेतलेल्या व्यक्तीला झालेल्या आजाराचे निदान होत नाही तोपर्यंत त्यावर बारीक अभ्यास सुरू ठेवला जातो.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- Satara Corona: डॉक्टरांना धक्काबुक्की करून कोरोना बाधिताची कृष्णेच्या पात्रात आत्महत्या
- सिरो सर्व्हे: पुण्यातील ५१.५ % लोकांना होऊन गेला कोरोना, समजलेच नाही!