अन्ध महासागर आणि प्रशांत महासागर यांचे पाणी न मिसळण्याचे खरे कारण

0
अन्ध महासागर आणि प्रशांत महासागर यांचे पाणी न मिसळण्याचे खरे कारण

अन्ध महासागर आणि प्रशांत महासागर यांचे पाणी न मिसळण्याचे खरे कारण

आपल्या पृथ्वीवरील ७०% भाग पाण्याखाली आहे हे आपल्याला माहीत आहेच. पृथ्वीवर एकूण ५ महासागर आहेत ज्यांच्या सीमा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या महासागरविषयी वैज्ञानिक अजूनही संशोधन करत आहेत, त्यावरून वेगवेगळे शोध लावले जात आहेत.
परंतु समुद्राच्या अचाट भागामुळे आजपर्यंत फक्त २०% समुद्राचा अभ्यास करणे शक्य झालेले आहे. समुद्र अथांग आहे हे यावरून लक्षात येतेच. समुद्रातील खोलीत अनेक प्रकारचे रहस्य लपलेले आहेत. अजूनही विविध प्रकारच्या जाती समुद्राच्या खोलीमुळे अस्तित्वात असल्याचे पुरावे नाहीत. समुद्राच्या बाबतीतले एक रहस्य आज आपण पाहुयात

जेव्हा दोन नद्याचा संगम होतो तेव्हा तिसरी नदी तयार होते हे आपण पाहत आलोय. परंतु या व्हिडिओ नुसार दोन समुद्र एकमेकांना भेटत असूनही ते एकत्रित होत नाहीत हे पाहायला मिळते. हे दोन समुद्र आहेत अन्ध महासागर Atlantic Ocean आणि प्रशांत महासागर Pacific Ocean हे एकमेकासोबत अलास्काच्या खाडीत मिळतात. परंतु या दोघाचे पाणी एकमेकासोबत मिसळत नाही. दोघाचेही पाणी आपण डोळ्याने वेगवेगळे असल्याचे पाहु शकतो. अलास्काच्या खाडीत असे दोन वेगवेगळे समुद्र आपण डोळ्याने पाहु शकतो. आपल्याला यात दोन वेगवेगळ्या रंगाचे समुद्र दिसतात. पाण्याचा रंग वेगवेगळा आहे याचे कारण आहे की ग्लेशियर मधून येणाऱ्या पाण्याचा रंग हा हलका निळा असतो आणि समुद्रातील पाण्याचा रंग गर्द निळा असतो.

तर मग हे दोन्ही समुद्र एकमेकांत मिसळत का नाहीत?

दोन्ही पाण्यात असलेले क्षारांचे प्रमाण हे याचे पाणी न मिसळण्याचे मुख्य कारण आहे. या दोन्ही पाण्यातील क्षार, घनत्व व तापमान वेगवेगळे असून ग्लेशियर मधून येणारे पाणी हे गोड असते त्यामध्ये क्षाराचे प्रमाण नसते आणि समुद्रातील पाणी हे खारे असते आणि त्यात क्षार भरपुर प्रमाणात असतात. या पाण्याचे घनत्व वेगवेगळे असल्यामुळे हे दोन्ही पाणी एकमेकात मिसळत नसल्याचे वैज्ञानिक कारण आहे.
अनेक लोक याचा संबंध देवांशी किंवा धर्माशी जोडून चमत्कार मानतात परंतु यात काहीही तथ्य नसून हे पाणी आपल्या घनत्वामुळे एकमेकासोबत मिसळत नाही. हे पाणी काही वेळानंतर जास्त वेळ संपर्कात आल्यानंतर एकमेकांत मिसळते आणि दोन्ही मिळून पुन्हा क्षारयुक्त पाणी तयार होते.
तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती.

आवडल्यास नक्की शेअर करा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

For More:
तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार

Gully Boy साठी रणवीर ने केला बॉडी मध्ये मोठा बदल

व्हॉट्सअॅपद्वारेही पैसे पाठवता येणार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.