पाकिस्तानचा खरा चेहरा उघड..
नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तान मध्ये अटकेत असताना त्यांना भेटण्यासाठी त्याची आई व पत्नी गेले असता. पाकिस्तानने त्यांच्या आईला कुलभूषण यांच्या सोबत मातृभाषेमध्ये म्हणजे मराठी मध्ये संवाद करू दिला नाही. यातूनच पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होतोय.
कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला बांगड्या, टिकल्या आणि ‘मंगळसूत्र’ सुद्धा काढायला लावले होते. त्यांची खरे फक्त भेट झाली, बोलणे झालेच नाही.
#WATCH MEA spokesperson Raveesh Kumar on meeting of #KulbhushanJadhav‘s mother and wife with Jadhav in Islamabad pic.twitter.com/O6HkKoc7WK
— ANI (@ANI) December 26, 2017
याबाबतची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
भारताने, मात्र आईला मुलासोबत त्याच्या भाषेत बोलू न देणं ही कुठली सुरक्षितता? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव ही बंधनं घातली. त्यांचं बोलणेही फोन वरून झाले आहे.
कुलभूषण यांच्या अंगावर जे निशाण आहेत त्यावरून पाकिस्तानने त्यांचा छळ होत आहे, हे स्पष्ट होत आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. असली तरी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या याचिकेच्या नंतर फाशीची शिक्षा या निर्णयावर स्थगिती दिली आहे.