25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

0
25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

Parenting Tips मुलांसोबत कसे वागावे बोलावे हे आजच्या आई-वडिलांना पडणारा एक सामान्य प्रश्न आहे.

काही पालक आपल्या मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम नातेसंबंधावर होतो. आपले आणि मुलांमधील अंतर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुलांसोबत कसे वागावे याबद्दल काही Parenting Tips थोडक्यात,

25 Parenting Tips Marathi

1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा
२. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो
3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला
4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला हळूहळू Avoide करतील
5. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा. चांगल काम केलेलं असेल तर काैतुक करावे.
6. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा, कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत, पैसे नाही.
7. आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे
8. मूल हि Investors नाहीत, माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका
9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका
10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल.
11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा
12. आपल्या मुलांची गरज समजून घ्या
13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या
14. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही … नालायका , गधडा वगैर सारखे शब्द वापरणे टाळावे
15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई. मुलांना काही Calculated Risk घेऊ द्यावी. यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल. जसेकी झाडावर चढणे.
16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत … मूल खोट बोलायला शिकतात … प्रेमापोटी देखील मारू नये
17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन, तुला एकट सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये
18. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल Appreciation असावं
19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते
20. मुलांच्या Progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा
23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात…. यासाठी घरातील ‘बाबां’नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान , लॉस घरी कुटुंबाशी share करा , मूल कितीही वयाचं असेल तरीही …! यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल
24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा.
25. आपल्या मुलांचे Role Model बना

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती?

मी कार्यकर्ता: साहेबांचा कार्यकर्ता

दोन गुरू: भूक आणि अपमान Nana Patekar History नाना पाटेकर यांनी लिहिलेला त्यांच्या पुर्वायुष्यातील भावस्पर्शी अनुभव

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.