लक्ष्मण जगताप करणार पार्थ पवार यांना मदत !

0
लक्ष्मण जगताप करणार पार्थ पवार यांना मदत !

मावळ उमेदवार पार्थ पवार आणि भाजपचे नाराज लक्ष्मण जगताप आज योगायोगाने एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Parth Pawar meet Lakshman Jagtap in Pimple Gurav. This leads specalutions of Lakshman Jagtap supporting Parth Pawar. They talked about 15 minute during this meeting.

झाले असे की आज पार्थ पवार हे शिवजयंती निमित्त मंडळांना भेट देत होते. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचे विरोधक असलेले लक्ष्मण जगताप सुद्धा भेट घेत होते. यात दोघे एकाच ठिकाणी आले. पार्थ पवार यांनी जगताप यांच्याशी हातमिळवणी करत “उमेदवार आहे, मदत करा” अशी साद घातली. यावर लक्ष्मण जगताप यांनी “ती करूच”  असा शब्द दिल्याने मावळ भागात चर्चेला उधाण आले आहे. नगरसेवक नाना काटे यांनी यावर उजाळा दिला.

Parth Pawar and Lakshman Jagtap in Pimple Gurav

दोघांनी मिळून एकत्र फोटो सुद्धा काढले. हे फोटो सर्वत्र वायरल होत असून पार्थ पवार यांच्यासाठी एक जमेची बाजू झाली आहे.

मागच्या 2014 लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शेकापच्या तिकिटावर उभे असलेले लक्ष्मण जगताप यांना हरवले होते. परंतु लक्ष्मण जगताप यांनी 354829 मते मिळवली होती. यावेळी सुद्धा ते उत्सुक होते परंतु युतीमध्ये मावळ जागा शिवसेनेच्या पारड्यात पडल्याने लक्ष्मण जगताप गट नाराज आहे.

राष्ट्रवादीचे मावळ उमेदवार पार्थ पवार यांना याचा किती फायदा होतोय हे पाहावे लागेल.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

READ MORE:

Parth Pawar Biography, Information, Wiki, Education, Age, Family

“बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं” पार्थ पवार यांचे ट्रोल करणाऱ्यांना उत्तर

Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.