पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार, हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

0
पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार, हस्तक्षेप याचिका दाखल करणार!
Share

पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी दंड थोपटत मैदानात येण्यास सज्ज झाले आहेत. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पार्थ पवार म्हणजेच शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र यांनी मराठा आरक्षण विषयात उडी घेत मराठा नेत्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असे ट्विट करत सांगितले आहे.

काय म्हणाले पार्थ पवार?

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलायला हवीत.

विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.

मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचे दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.

यावर त्यांनी ट्विट केले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.