पतंजली कोरोना किट ने कोरोना रुग्ण होणार 7 दिवसांत बरा, 545 ₹ मध्ये किट

0
पतंजली कोरोना किट ने कोरोना रुग्ण होणार 7 दिवसांत बरा, 545 ₹ मध्ये किट
Spread the love

पतंजली आयुर्वेदिक ने आज एक आयुर्वेदिक पतंजली कोरोना किट लाँच केले आहे. या पतंजली किट मुळे सात दिवसात कोरोना व्हायरस झालेला रुग्ण बरा होऊ शकतो. रूग्णांवर केलेल्या प्रयोगावेळी १०० टक्के रुग्ण पतंजली कोरोना किट मुळे बरे झाले आहेत. या किट मुळे रुग्णावर उपचार होत असला तरी जगभरातील वैज्ञानिक व्हायरस लागण होऊ नये यासाठी लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पतंजली चे संस्थापक रामदेव बाबा यांनी सांगितले की, “कोरोनिल आणि स्वसारी” नावाची औषधे देशभरातील 280 रुग्णांवर केलेल्या संशोधनावर आणि चाचण्यांवर आधारित तयार केले गेले आहे.

जयपूर NIMS च्या मदतीने पतंजली ने कोरोना रुग्णांवर क्लिनिकल नियंत्रणावर अभ्यास केला आहे. त्यातून सर्वात मोठी गोष्ट समोर आली आहे. तीन दिवसांत 69 टक्के रुग्ण बरे झाले आणि पॉझिटिव्ह (केसेस) पासून नीगेटीव्ह झाले आणि उरलेले रुग्ण सात दिवसांतच १०० टक्के नीगेटीव्ह झाले, असे रामदेव बाबा म्हणाले.

पतंजली कोरोना किट वैशिष्ट्ये

  • हे किट २ तासांच्या आत घरपोच मिळण्यासाठी ई-कॉमर्स अ‍ॅप देखील सुरू केले जाणार आहे.
  • हे औषध अधिक प्रभावी करण्यासाठी यामध्ये औषधी वनस्पतींसह खनिजांचा वापर केला आहे.
  • पतंजलीचा असा दावा आहे की त्याची कोरोना औषधी किट कोरोना व्हायरस प्रतिबंध म्हणून देखील घेतली जाऊ शकते.
  • कोरोना किट अवघ्या 545 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कोरोना किटमध्ये 30 दिवस औषधे आहेत.
  • हे औषध किट आत्ता कुठेही उपलब्ध नाही, ते पतंजली स्टोअरमध्ये या आठवड्यात उपलब्ध होईल

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.