पतंजली चा खोटेपणा उघड, लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्याने केला खुलासा

0
पतंजली चा खोटेपणा उघड, लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्याने केला खुलासा
Share

कोरोना औषध शोधल्याचा दावा केल्यानंतर पतंजली अचानक प्रकाशझोतात आले होते. बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला आणि अनेकांना कोरोना रोगाची भीती वाटायची कमी झाली. पंतजली योगपिठ ने कोरोना किट लॉन्च केले आणि केंद्र सरकारनं यावर आक्षेप घेत जाहिरातबाजी बंद करण्यास सांगितले आणि औषधाबद्दल सरकारला माहिती देण्यास सांगितले.

पतंजली ने काढलेल्या कोरोना औषधांला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधासाठी परवानगी घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

पतंजली आयुर्वेदिक ने आज एक आयुर्वेदिक कोरोना किट लाँच केले आहे. या पतंजली किट मुळे सात दिवसात कोरोना व्हायरस झालेला रुग्ण बरा होऊ शकतो. रूग्णांवर केलेल्या प्रयोगावेळी १०० टक्के रुग्ण पतंजली कोरोना किट मुळे बरे झाले आहेत.

पतंजलीचे कोरोना औषध परवानगी देणाऱ्या उत्तराखंड आयुर्वेद विभाग परवाना अधिकाऱ्यांने याबाबत खुलासा केला आहे. औषधाच्या परवानगीसाठी केलेल्या अर्जात कोरोना व्हायरस असा कुठेही लिहिलेले नव्हते. हे औषध कोरोना रोगावर उपाय म्हणून असा कुठेही उल्लेख नव्हता. या औषधाला फक्त रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर उपाय म्हणून औषध यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना औषध किट तयार करण्याची परवानगी पतंजलीला कशी मिळाली, यासाठी पतंजली आयुर्वेद ला नोटीस पाठवणार आहे असे परवाना अधिकारी म्हणाले.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.