महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

0
महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

महापौर राहुल जाधव यांचा प्रवास

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौरपदी आज भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांची निवड होणार आहे. वर्षभरापूर्वी मनसेतुन भाजपध्ये प्रवेश केलेल्या राहुल जाधव यांना महापौर पदाचा कारभार मिळणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या गटातील राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख मात्र खडतर होता. तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या राहुल जाधव हे आज शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.

महापौर राहुल जाधव माहिती

नियोजित महापौर राहुल जाधव हे भोसरीच्या आमदारांचे कट्टर समर्थक आहेत. शेतकरी कुटुंबातील राहुल जाधव यांना बैलगाडा शर्यतीची आवड आहे. त्यांचे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे. भोसरी प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या विजयात राहुल जाधव यांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जाते.

दहावी होताच शेती परवडत नसल्याने राहुल जाधव यांनी पॅगो रिक्षा चालवत उदरनिर्वाह केला. 2006 ला ते राजकारणात खऱ्या अर्थाने उदयास येत मनसेसोबत काम करण्यास सुरूवात केली. 2012 ला मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. 2017 ला मात्र मनसेला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपचा हात धरला. ते भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली होती. मात्र, स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत.
असा हा रिक्षाचालक ते महापौर प्रवास थक्क करणारा आहे….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका: महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा

टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.