पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व नद्यांमधील जलपर्णी काढणार

0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व नद्यांमधील जलपर्णी काढणार

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्या येतात. या तिन्ही नद्यांना जलपर्णी नी ग्रासलेले आपल्याला दिसत असेल. परंतु आता या नदींचे रूप पालटणार आहे. या तीनही नदीची संपूर्ण जलपर्णी काढण्यात येणार आहे. नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तब्बल सव्वादोन कोटी रूपये खर्च करणार आहे.

महाराष्ट्रातील नद्यांना जलपर्णी सारख्या प्रदूषित पाण्यावर जगणाऱ्या रोपट्यांनी वेढले आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. 

Pimpri Chinchwad Jalparni

पवना नदी २४ किलो मीटर, इंद्रायणी १९ आणि मुळा नदी १० किलो मीटर असे नदीपात्र पिंपरी चिंचवड शहराला लाभले आहे. चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी याठिकाणी वाढणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहराच्या वाढत्या रुपामुळे नदीतील जलपर्णी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आपल्याला पाहायला मिळत होती. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने नदी आहे की नाला यातील फरक समजायला अवघड जात होते. या जलपर्णी काढण्याची वारंवार मागणी नागरिक आणि सामाजिक संस्था करत होत्या. नदीच्या वाढत्या कुरुपतेमुळे महापालिकेमार्फत पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलपर्णी कुठे कुठे काढणार?

‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ग’ ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय: सांगवडे, किवळे पूल, दापोडी संगम येथपर्यंत पवना नदीचे संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

‘क’, ‘फ’, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय: आयटी पार्क निघोजे पुल ते कुदळवाडी, चिखली, डुडुळगाव स्मशानभुमी समोरील बंधा-यापर्यंत इंद्रायणी नदीचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

‘ड’, ‘ह’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय: वाकड पुल ते पिंपळे-निलख स्मशानभूमी, औंध – सांगवी पुल ते दापोडी हॅरिस ब्रीज, आणि बोपखेलपर्यंत हद्दीतील जलपर्णी काढून नदीचे संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बोपखेल, रामनगर, गणेशनगर या भागातील नदीपात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

मुंबई स्थित साई प्राईट या कंपनीला 2 कोटी 29 लाख रूपये करारावर हे काम देण्यात आले आहे. जलपर्णी काढल्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीपर्यंत जलपर्णी न वाढून देण्याचे बंधन या निविदेत दिले होते. यामुळे पुढील वर्षभर तरी पिंपरी चिंचवड करांना नदीपात्र स्वच्छ दिसेल यात शंका नाही.

या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील नद्या तरी साफ होतील परंतु पुणे भागातील नद्यांचे काय होणार हे पाहावे लागेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?

महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.