पेट्रोल डिझेल च्या किमती भडकणार, ४ ₹ पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता
कर्नाटक निवडणुकीच्या धर्तीवर पेट्रोलच्या आणि डिझेल च्या किमती स्थिर ठेवल्या होत्या, परंतु गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. ब्रोकरेज कंपनीच्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसात या किंमती आणखी भडकू शकतात. आधी तेल कंपन्यांना पेट्रोलच्या आणि डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सोमवारपासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक दिवशी पैसे पैसे वाढवत पेट्रोलच्या आणि डिझेल च्या किमती वाढविल्या जात आहेत.
आज पुण्यात पेट्रोलचे दर ८३ ₹ च्या वर असून ते जवळपास ८७-८८ ₹ पर्यंत भडकणार असुन लोकांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?