Petrol to Electric: पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक करण्याआधी हे वाचा, खर्च जाणून घ्या

0
Petrol to Electric: पेट्रोल बाईक इलेक्ट्रिक करण्याआधी हे वाचा, खर्च जाणून घ्या
Share

Petrol to Electric रूपांतर मुळे भारतात सध्या इलेक्ट्रिक बाईक ची चांगलीच क्रेझ सुरू असून पेट्रोल दरवाढीनंतर लोकं आता पेट्रोल बाईक चे इलेक्ट्रिक बाईक मध्ये रूपांतर करत आहेत.

Hero Honda Splender Petrol to Electric Convert details

पेट्रोलच्या दरवाढीतून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक जण त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये बदलत आहेत. Petrol to Electrical convert Bike कशी होते, त्याचा खर्च काय, कायद्यात याला मान्यता आहे का हे आपण समजून घेऊयात.

अनेकजण सध्या आपल्या बाईकमधील पेट्रोल इंजिन काढून त्याजागी बॅटरी बसवून घेत आहेत. याचा खर्च सुद्धा कमी असून पेट्रोल ऐवजी ही बाईक चांगलीच परवडत आहे.

बाईक इलेक्ट्रिक करण्यास किती खर्च होतो?

सध्या सोशल मीडियावर अनेक जाहिराती दिसत असून यात कोणत्याही बाईक ला इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतर करण्याचा दावा केला जात आहे. यावर केवळ 10 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून बॅटरी नुसार हा खर्च वाढत जातो. ही गाडी एका एकदा चार्ज केल्यानंतर 300 किमी पर्यंत जाऊ शकते. गाडीचा वेग ताशी 65-70 किमी आहे.

Petrol to Electric Engine Convert कसे केले जाते?

पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित करताना गीअर बॉक्स काढून टाकला जातो आणि त्यानंतर बाईक थेट मोटर ला जोडून त्याचा वेग अॅक्सिलरेटरद्वारे नियंत्रित केला जातो. अगदी आपण चालवत असलेल्या स्कूटी सारखी ही गाडी चालते. कोणत्याही गियर विना आपण गाडी चालवू शकता.

गाडीत बदल करणे कायदेशीर आहे का?

तर याचे सरळ उत्तर आहे “नाही“, कोणत्याही गाडीमध्ये बदल करणे हे कायद्याने गुन्हा असून मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 52 नुसार कोणत्याही मोटार वाहनात बदल करता येत नाही, इंजिन मध्ये सुद्धा बदल करण्यास परवानगी नाही, रंग सुद्धा बदलणे कायदेशीर गुन्हा आहे. यानुसार यात दंड देखील भरावा लागू शकतो. त्यामुळे आपण आपली गाडी Petrol to Electrical convert करत असाल तर सावध राहा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.