भोसरी येथील राहत्या घरी विलगिकरण मध्ये असलेला इसम पसार झालेला होता. भोसरीतील एका रुग्णाला महापालिका कर्मचारी आणि पोलीस यांनी मिळून शुक्रवारी शोधून काढले.
या रुग्णाला सध्या महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात ‘आयसोलेशन’ कक्षात ठेवले गेले आहे. कोणताही ‘होम क्वारंटाईन’ रुग्ण घराबाहेर फिरत असल्यास नागरिकांनी कळवण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. थोड्याच दिवसांपूर्वी भोसरी रुग्णालयातून विलगिकरण कक्षात ठेवलेला संशयित फरार झाला होता. आता भोसरीतील ही दुसरी घटना आहे

नॉर्वे वरून आलेल्या या तरुणाला तीन दिवसांपूर्वी १४ दिवस होम क्वॉरंटाईन च्या सूचना होत्या. मात्र, तो नेहमी घरातून बाहेर पडायचा, पाहुण्यांचीही ये जा सुरू होती, एसीमध्ये न बसण्याचा सल्ला दिला असताना ही त्याने एसी ऑपरेटरला घरात बोलावलं, सदर व्यक्ती तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरत होती. अशा तक्रारी आल्या होत्या. पालिका आरोग्य विभागाने त्याला समज देऊन घरी राहण्यास सांगितले होते.
कहर म्हणजे महापालिका तपासणी पथक तपासणी साठी घरी गेली असता हा रुग्ण आज घरी आढळला नाही. कुटुंबियदेखील घरी नसल्याने महापालिका कर्मचारी यांनी पोलिसांच्या सहाय्याने शोध सुरू केला. त्यानुसार त्या व्यक्तीला फोन करून घरी बोलावण्यात आले. बँकेत गेलेला असल्याचे कारण त्या व्यक्तीने सांगितले परंतु वारंवार केलेल्या उल्लंघनामुळे शेवटी त्याला ताब्यात घेत महापालिकेच्या भोसरीतील रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात ठेवले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असताना रुग्ण बाहेर फिरल्याने इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये बाधा झालेल्यांचा आकडा वाढत चालला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बहुतांश रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ करणे बंधनकारक केले गेले आहे. महापालिकेकडून ‘होम क्वॉरंटाईन’चे आवाहन सातत्याने केले जात आहे. परंतु अशा पळून जाण्याने प्रशासनावरील ताण वाढत आहे.
‘होम क्वॉरंटाईन’ व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे आढळल्यास 8888006666 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. महापालिकेच्या 9922501450 हा व्हॉट्सअँँपवर संपर्क क्रमांक आहे. यावर सुद्धा आपण संपर्क साधून माहिती सांगू शकता.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
- रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi
- सुनील शेट्टीचे खंडाळा मधील आलिशान फार्म हाऊस
- Best Pawna Lake Camping For Couples: Top 3 Pawna Camping