पिंपरी चिंचवड महानगरपालिका: महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा

0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका: महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-चिंचवडचे भाजपाचे पहिले महापौर नितीन काळजे यांनी आयुक्तांकडे मंगळवार दुपारी अचानक राजीनामा दिला. तत्पूर्वी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे राजीनामा दिला होता. आता महापौरपदासाठी नव्या इच्छुकांची रस्सीखेच होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका: महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा

महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर नामदेव ढाके, राहुल जाधव, शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे या इच्छुकांची नावे पुढे आली असून यात कोणाची वर्णी लागणार हे पाहावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पिंपरी-चिंचवड मध्ये क्रांतीकारक चापेकर स्मारक समितीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या नियोजित इमारतीचे भूमीपूजन करण्यासाठी आले होते. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत राजकीय गुफ्तगू झाल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदाधिकारी बदलाला परवानगी दिली. पक्षाने महापौर आणि उपमहापौरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी….

मोबाईल एअरबॅग केस डिज़ाइनचा शोध, पडताच स्वयंचलितरित्या उघडून मोबाइलला वाचवणार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.