व्हाईट कॉलर दादांनी मी असेपर्यंत दुसरा उद्योग बघावा: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

0
व्हाईट कॉलर दादांनी मी असेपर्यंत दुसरा उद्योग बघावा: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Spread the love

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारांना तंबी दिलेली आहे. शहरात कायद्याचे पालन करणारे अनेकजण आहेत, मात्र काही मोजक्या गुन्हेगार, व्हाईट कॉलर गुन्हेगार, लँड माफिया, दादा-भाऊ यांनी कायद्याचे उल्लंघन करत गुन्हेगारी वाढवली असल्याने मी आहे तोपर्यंत दुसरा उद्योग बघावा असा कडक इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.

सर्व सामान्यांच्या सेवेसाठी मी स्वतः २४ तास उपलब्ध असेन आणि लोकांनी बिनधास्तपणे संपर्क करण्याचे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. गुन्हेगारांना कोणतीही सवलत मिळणार नसून गुन्हेगारांवर कदक कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.

संदीप बिष्णोई यांच्याकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या आयुक्‍त पदाचा पदभार कृष्ण प्रकाश यांनी स्विकारल्यानंतर गुन्हेगारांना दम भरला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी असून, यामध्ये आयटी, एज्युकेशन हब असून पिंपरी चिंचवड मध्ये कामगारांची संख्या अधिक आहे. सर्व घटकांचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. शहरात माथाडी दादा, व्हाईट कॉलर दादा, लँड माफिया असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शहरात यापुढे यांचे धंदे चालणार नाही. कायद्यात राहून सर्व करावे. कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्याची पोलीस कंबर मोडतील असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.