उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड चा विकास वाखाणण्याजोगा आहे. उद्योगनगरीच्या जडणघडणीत स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. आण्णासाहेब मगर यांचे मोलाचे योगदान असून टे कदापि विसरता येणार नाही. असे प्रतिपादन माजी केंत्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पिंपरी चिंचवड अचीव्हर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा व गौरव समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात शून्यातून आपले विश्व निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील उद्योजकांना शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘पिंपरी चिंचवड अचीव्हर्स’
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘पिंपरी चिंचवड अचीव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात आकाश सेंगर, ए. बाल्सुब्र्ह्मण्यम, अजय विजय, आकाश गोंदावले, अमित वाघ , आनंद गायकवाड , अनिल काळे, अनिल काटे, अनिता शिंदे, अरविंद सोलंकी, बी. परनधामन, बजरंग मोळक, गजानन चरपे, गुरुराज चरंतीमठ , हेमंत इंगळे, कविता भोंगळे, किरणराज चोप्रा, कोमल साळुंखे, महेंद्र थोपटे, मकरंद पांडे, नितीन धिमधिमे , माऊली फरांदे, मिलिंद पांडे, पी.डी. पाटील, प्रविण गांजरे, रघुनाथ तापकीर, राजेंद्र देशपांडे, राजेंद्रसिंह यादव, राम फुगे, रमेश चौधरी, रमेश शेट्टी, रत्नकांत भोसले, रवींद्र आळने, संदीप बेलसरे, संतोष बारणे, संतोष हेगडे, किसन पाटील, संतोष माने, स्वप्नील बालवडकर, संतोष सौंदनकर, सर्वेश शाह, श्रीकांत मचाले, सुदाम भोरे, सुहास कांबळे, सुंदरराव जगदाळे , सुरेंद् वधवा, तुषार शिंदे, उमेश फाळके , वंदना चौहान, विजय नागदेव, विजय फुगे , विलास भांबुर्डेकर, विवेक चढ्ढा, विवेक मुगळीकर, विवेक सावंत,यशवंत इंगळे यांचा समावेश होता.
अजित पवारांचं केलं कौतुक:
अजित पवार काय चीज आहे हे पिंपरी चिंचवड करांनी विकासकामांच्या माध्यमातून पाहिल आहे. असे विधान यावेळी शरद पवार साहेबांनी केले.