प्रधानमंत्री आवास योजना मुदत वाढवली, ६ लाख ते १८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना फायदा

0
प्रधानमंत्री आवास योजना मुदत वाढवली, ६ लाख ते १८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना फायदा

प्रधानमंत्री आवास योजना सीएलएसएस योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० होती. पण आता प्रधानमंत्री आवास योजना मुदत ३१ मार्च २०२१ करण्यात आली आहे. एलआयजी / ईडब्ल्यूएसच्या अन्य श्रेणीची तारीख ३१ मार्च २०२२ आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषदेत एमआयजी-१ आणि एमआयजी-२ या दोन्ही प्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) क्रेडिट-लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस) ची अंतिम तारीख वाढविली आहे. पीएमएवाय सीएलएसएस योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही आता ३१ मार्च २०२१ रोजी पर्यंत लाभ घेता येऊ शकतो.

सरकारच्या म्हणण्यानुसार या मुदतवाढीचा उद्देश मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना फायदा व्हावा हा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यानुसार आतापर्यंत सुमारे 3.3 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पुढे जाऊन जवळपास अडीच लाख कुटुंबे सीएलएसएससाठी नामांकित होण्याची अपेक्षा आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे या क्षेत्रात नोकर्‍या वाढतील आणि स्टील, सिमेंट आदी बांधकाम साहित्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. या योजनेचा थेट फायदा मध्यमवर्गीय लोकांच्या खिशात जाणार असून बाजारपेठ मध्ये पैसा हस्तांतरण होत राहील.

पीएमएवाय सीएलएसएस ही योजना ‘सर्वांसाठी घर’ या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. ज्यामध्ये पात्र कर्जदार कमी व्याज दराने बँक आणि गृह फायनान्स कंपन्यांकडून गृह कर्ज मिळवू शकतो.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजना काय आहे?

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ६ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेले लोक एमआयजी-१ च्या खाली येतात आणि 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याज अनुदान मिळते. तसेच १२ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेले लोक एमआयजी-२ अंतर्गत येतात आणि ९ लाखापर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज अनुदान मिळते.

प्रभावीपणे, PMAY CLSS अनुदानाची रक्कम एमआयजी-१ आणि एमआयजी-२ योजनेसाठी अनुक्रमे २,३५,०६८ रुपये आणि २,३०,१५६ रुपये आहे.

©PuneriSpeaks

महाराष्ट्र आणि पुणे मधील विविध अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम वर फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.