PMRDA नोटीस: हवेली व शिरूर तालुक्यातील २३ हजार बेकायदा बांधकामांना नोटीसा

0
PMRDA नोटीस: हवेली व शिरूर तालुक्यातील २३ हजार बेकायदा बांधकामांना नोटीसा

PMRDA (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) ने शिरुर व हवेली तालुक्यातील बेकायदा बांधकामांना नोटीसा बजावल्या आहेत. PMRDA नोटिस मुळे तब्बल 23 हजार कुटुंबे सध्या भितीच्या सावटाखाली आहेत. PMRDA ने पाठवलेल्या नोटीस मुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

PMRDA नोटीस कोणाकोणाला?

PMRDA कडून जिल्ह्याच्या बांधकाम आराखड्यानुसार बांधकामांची पाहणी करुन शासकीय निकषात न बसलेली सर्व बांधकामे सध्या बेकायदा संबोधली जात आहेत. यात हवेली तालुक्यातील १७०००+ तर शिरूर तहसील कार्यक्षेत्रातील ५०००+ बांधकामांना नोटीस मिळाल्या आहेत. काही जणांना प्राथमिक व त्यानंतर थेट कारवाईची ५३-अ ची नोटीस मिळालेली आहे. ५३-अ नोटिसनुसार नोटीस दिल्यापासून २४ तासात कधीही बांधकाम पाडण्याची कारवाई होऊ शकते.

PMRDA नोटीस वरून अधिकाऱ्यांचे म्हणणे

संपूर्ण जिल्ह्यात आम्ही जवळपास दोन हजार बेकायदा बांधकामांना PMRDA नोटीस दिल्या आहेत. उर्वरित हजारो संख्येच्या बेकायदा बांधकाम नोटीस या सन २०१५ मध्ये तत्कालीन हवेली व शिरुर तहसिलदारांकडून आमच्याकडे वर्ग होवून सन २०१८ मध्ये वितरीत केलेल्या आहेत. जे लोक पूर्वीच्या नोटीशींना प्रतिसाद देत नाहीत, जी बांधकामे नियमित होवू शकत नाहीत अशांवर आम्ही कारवाया करतो.

PMRDA अनधिकृत बांधकाम हटाव विभागाचे अधीक्षक सारंग आवाड

PMRDA चे अधिकारी प्रतिनियुक्तीवर असून उर्वरित कर्मचारी कंत्राटवर आहेत. हद्दीतील सुमारे ८५० गावांमध्ये बांधकामांमध्ये सुसूत्रता नाहीये, याचे दुष्परिणाम पुढील बांधकामावर होणार आहेत. याची काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांनी रितसर परवानगी घेवून बांधकामे करणे बंधनकारक आहे, झालेली बांधकामे काही दंडात्मक कारवाई करुन नियमित करुन घ्यावीत एवढी आमची अपेक्षा आहे. आम्ही ज्या नोटीसा बजावल्यात त्या इंडस्ट्रीयल, कमर्शियल व गोडाऊन बांधकामांच्या आहेत; घरांच्या नाहीत.

PMRDA तहसिलदार गीता दळवी

सध्यातरी नोटीस मिळलेल्याची झोप उडाली आहे हे खरेच. पुढे काय होतंय हे पाहावं लागेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो

महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.