Monsoon Maharashtra महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई : राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारताच्या दक्षिणेकडे समुद्रावर ढग दाटी वाढलेली असल्याने वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता वाढलो आहे. यावर्षी हवामान खात्याने ६ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मान्सून दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागर येथील संपूर्ण अंदमान बेटसमूहांना मान्सून ने व्यापले आहे.
१८ मे रोजीच नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने या अंदाजानुसार दोन दिवसात पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. या मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. येत्या ४८ तासात निकोबार बेटांवर पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळेल हे नक्की.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.