म्हणून मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी लावला डीजे

0
म्हणून मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी लावला डीजे

आजपर्यंत आपण आनंदाच्या क्षणी डीजे लावून चाललेल्या मिरवणुका पाहिल्या असतील. मात्र नागपूरमध्ये एका अंत्ययात्रेमध्ये डीजे लावलेला पाहायला मिळाला.

एकीकडे अंत्ययात्रेमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजत होता आणि दुसरीकडे लोकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. ही अंत्ययात्रा काही कोणा साध्यासुध्याची नव्हती तर होती महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत या तरुणांची. वयाच्या २२ व्या वर्षी गळफास घेऊन प्रणव ने आत्महत्या केली होती.

शास्त्री स्टेडियम, अकोला येथील ‘क्रीडा प्रबोधनी’ मध्ये प्रणवने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा मध्ये प्रणव राऊत याने सुवर्णपदक कमावले होते. त्याच्या आत्महत्येमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २२ वर्षाच्या मुलगा देवाघरी गेलेला असताना वडिलांनी अंत्ययात्रेत चक्क डीजेच लावल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.

मुलाच्या अंत्ययात्रेत का लावला डीजे?

थोड्याच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय निवड चाचणी पार पडली होती. यात प्रणव राऊत याला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाच्या नैराश्येतून प्रणवने आत्महत्या केल्याने त्याच्या वडीलांना धक्का बसला आहे. प्रणवने आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये, “बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही,” असं लिहिलेले होते. मागे एकदा आपली अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी अशी इच्छा प्रणवने वडिलांकडे बोलून दाखवली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांना तरुण मुलगा देवाघरी गेलेला असतानाही त्याच्या इच्छेखातर अंत्ययात्रेला डीजे लावून अखेरचा निरोप द्यावा लागला.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

ऐतिहासिक वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.